२००८ साली मराठी पत्रकारीतेत आय बी एन लोकमतचा जन्म झाला, आणि मराठी पत्रकारितेला नवा आयाम मिळाला. अनेक दर्जेदार कार्यक्रमांच्या माध्यामातून तमाम महाराष्ट्रीय प्रेक्षकांची मने जिंकली आणि सर्वोत्कृष्ट मराठी न्यूज चॅनेल म्हणून ख्यातीस पावले. ह्याच चॅनलच्या आजचा सवाल ह्या कार्यक्रमाने टेलिह्विजन इंडस्ट्रीत चालणार्या चर्चासत्रांची परिभाषाच बजलून टाकली. आय बी एन लोकमतचे एडिटर इन चिफ श्री. निखिल वागळे यांची तुफानी अन प्रतिपक्षाची दाणादाण उडववून टाकणारी पत्रकारीता पाहायला मिळाली. आजच्या घडीला प्राईम टाईम मधील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम म्हटले तरी त्यात काही वावगे ठरणार नाही.
आजचा सवाल च्या ह्याच लोकप्रियतेचा मात्र आज गैरफायदा होउ लागलाय. गेल्या शतकात अमेरिकेतल्या सुप्रसिद्ध विचारवंत नाओम चोमस्कीने प्रसारमाध्यमांवर जोरदार आसूड ओढले होते. अभिजन वर्ग हा कशा प्रकारे मीडीयाचा वापर करून घेत आपल्याला हवी असलेली परिस्थिती निर्माण करून घेऊन स्वतःचा स्वार्थ साधत असतो.
ह्या आरोपाचे सखोल विश्लेषण करताना प्रोपोगांडा मॉडेल थेअरी मांडली. आणि आत ह्याच थेअरीचा वास सरळसरळ मराठी पत्रकारीतेतही येउ लागलाय.
गेल्या आठवड्यात आय बी एन लोकमतच्या आजचा सवाल मध्ये मनसेने अजित पवार आणि आर. आर. पाटील यांच्यावर केलेल्या आरोपात काही तथ्य आहे का? हा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीचे नरेंद्र वर्मा, मनसेचे शिरीष पारकर, औरंगाबादहून पत्रकार उन्हाळे, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड आणि राजकीय विश्लेषक म्हणून उदय निरगुडकर सामील झाले होते. चर्चा वादळी होणार हे प्रीअस्झ्युम्ड (PRE- ASSUMED) होते. एकटे उदय निरगुडकर सोडले तर प्रत्येकजण हा त्यांच्या संघटनांची बाजू भक्कमपणे मांडणार हे अपेक्षित होते अणि तसेच झाले देखील. उन्हाळे साहेबांना केलेले विश्लेषण अगदी सुरेख होते, त्यात त्यांच्या अनुभवाची झलक होती. पण डोके फिरले ते उदय निरगुडकर यांच्यावर. स्वतःला राजकीय विश्लेषक म्हणवणारे प्रस्तूत चर्चासत्रात एकंदरीत प्रकरणावर तटस्थ पाहून विश्लेषण करतील असे वाटले, परंतु मनसे किती लोकप्रिय आहे ह्याचेच गोडवे हे गात राहिले. एकटी मनसे किती चांगली आणि बाकीचे कसे नालायक हे सिद्ध करण्यात त्यांनी अख्खी शक्ती आणि वेळ वाया घालविला. वास्तवक पाहता कोणत्याही राजकीय विश्लेषकाला कोणत्याही एका ठराविक राजकीय पक्षाचा पुळका येता कामा नये, त्याला स्वतःचे असे मत असता कामा नये. जर असल्यास त्याने ते जाहीरपणे राजकीय विश्लेषकाच्या भुमिकेतून प्रकट करता कामा नये. सदर लिखाण वाचून कोणिही असा ग्रह करून घेऊ नये की मी राष्ट्रवादीचा पाठीराखा आहे किंवा मनसेचा विरोधक आहे. जे चांगलं त्याला चांगलं आणि जे वाईट त्याला वाईट म्हठलंच पाहिजे.
उदय निरगुडकर यांनी हवाले दिले की मनसे ही कीती लोकप्रिय आणि कोणत्याही पद्धतीचे भेद न माणनारी संघटना आहे, त्यासाठी त्यांनी इंटरनेटवर ३००० युजर्सनी राज ठाकरे यांचे भाषण अपलोड केले आहे वगैरे वगैरे. मला इथे एक कळत नाही, निरगुडकर काय रोज एक्झिट पोल अरेंज करतात काय की त्यांना कोण किती अप्रिय आणि प्रि. आहे हे चटकन कळते. वास्तविक पाहता
1) राज ठाकरेंसारखा चाणाक्ष राजकारणी ह्या पिढीला पाहायला मिळतोय आणि सध्या राज्याच्या राजकारणात कशा पद्धतीने सत्ता ही केवळ तरूणांच्या हातात आहे?
2) राज ठाकरेंनी अजित पवार आणि आर. आर. पाटील, पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे येणार्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा कोणत्या अंगाने जाईल?
3) पक्षबांधणी करताना आणि सिंगल पॉईंट अजेंडा राबवताना हळूच आपले नेतृत्व अत्यंत चलाखीने सर्वसमावेशक करु पाहणारे राज ठाकरे,
4) जनतेचा प्रतिनिधी असणार्या आमदारावर थर्ड डिग्रीचा झालेला वापर आणि त्याला प्रत्युतर म्हणून अर्वाच्य भाषेत दिलेले उत्तर हे कशाचे द्योतक मानावे?
ह्या विषयांवर उदय निरगुडकरांनी बोलोयला हवे होते तसे झाले नाही. काही वेळानंतर असे लक्षात आले की मनसेचे मुखपत्र असलेल्या "मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा" मध्ये ह्यांना लेख लिहिण्यासाठी जागा दिली आहे, ते मनसेचे समर्थक आहेत. बघा म्हणजे फिर्यादीनेच न्यायाधीश म्हणून मिरवायचे अशातला हा प्रकार होता. आता हे साटलोटं प्रत्येक पक्षाने धोरण म्हणूनच राबवले आहे. आजच्या पत्रकारीतेला प्रवक्ताकारीता बनवून टाकलीये. कॉंग्रेसच्या दर्डा घराण्याचे लोकमत हे वृत्तपत्र, शिवसेनेचे सामना, आणि काही प्रमाणात महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता केद्रिय धोरणांबाबत गांधी घराणे, पवार घराणे. अशी अनेक उदाहरणे देता येतील. नुकतेच उजेडात आलेले राडिया प्रकरण मीडीयाच्या फसवेगिरीबाबत डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे आहे. वास्तविक पाहता राजकीय विश्लेषण करण्यासाठी आलेले निरगुडकर हे बुद्धीभेद करणारे धूर्त प्रवक्ते आहेत आणि म्हणुनच गरज नसताना त्या कार्यक्रमात "हे राज्य मराठ्यांचे कि मराठींचे" असा जातीयवादी प्रश्न पुन्हा विचारला. त्याला प्रवीण गायकवाड ह्यांनी उत्तर दिलेच..परंतु एक मात्र स्पष्ट झाले. आत्ता सगळ्या प्रेक्षकांनी ह्या बुद्धीभेदाला जरूर ओळखावे, नाहीतर वरकरणी सज्जन, एलिट असणारी मंडळी समाजाचे फार मोठे नुकसान करू शकतात.
No comments:
Post a Comment