Monday, June 20, 2011

आरक्षण - भाग ९ (Reservation- Part 9)

मिडीया आणि आरक्षण विरोध ...
              प्रसारमाध्यमे मग ती कोणत्याही स्वरूपची का असेनात सगळीच्या सगळी भांडवलवादी अर्थव्यवस्थेला अतिउत्कृष्टपणे समर्थनीय बनवणारी सुसज्ज यंत्रणा.. अशा प्रकारे जर प्रसारमाध्यमांची व्याख्या केली तर त्यात कोणालाही नवल वाटण्याचे कारण नाही. इंग्रज भारतात आले आणि खर्‍या अर्थाने पत्रकारीतेच्या स्वरुपाची ओळख भारतीय समाजमनाला झाली. सुरूवातीला केवळ बातम्या मिळवण्याचे साधन म्हणून नावारुपाला आलेल्या वृत्तपत्र किंवा साप्ताहिकाला खरे महत्त्व प्राप्त झाले असेल तर ते भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीतच. त्याकाळात चालणार्‍या वृत्तपत्रांनी गुलामगिरीच्या गर्तेत झोपलेल्या भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची आग निर्माण केली. सेम एक्झांपल द्यायचे झालेच तर मराठा’, मुकनायक, बहिष्कृत भारत, दर्पण किंवा मार्मिक सारख्या वृत्तपत्र किंवा साप्ताहिकांचे घेता येईल. ह्या पत्रकांनी चळवळींना जन्म दिला, त्या चालवल्या आणि यशस्वी देखील करून दाखवल्या. चळवळींचे खर्‍या अर्थाने नायक बनलेल्या पत्रकांना बहुतांश समयी चळवळीच्या इप्सित ध्येय्यानंतर शोकांतिकेला सामोरे जावे लागले आहे.
               स्वातंत्र्यपूर्व काळात लढताना ज्या वृत्तपत्रांनी संबंध राष्ट्राला राष्ट्रीयतेची शिकवण दिली तीच वृत्तपत्रे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर स्वतःच्या वैचारिक अस्तित्वासाठी झगडू लागली. असो, त्यानंतर ९० च्या दशकात नव्याने उदयास आलेल्या भांडवलदारांनी न्यूज इंडस्ट्री मध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा गुंतवायला सुरूवात केली.  TIMES GROUPS, HT MEDIA, TV TODAY NETWORK, NDTV सारखे मिडीया जायंट नावारुपाला आले. सत्यासाठी पत्रकारिता करणारे संपादक जाऊन भांडवलदारांची संप्पती सांभाळणारे, गरज पड़ल्यास असत्याशी शय्यासोबत करणार्‍या दलाल संपादकांची फौजच जन्माला आली. पूर्वी NEWSPAPAER आणि NEWSCHANNEL  म्हणून काम करणार्‍या वृत्तपत्रे आणि वृत्तवाहीन्यांमध्ये एकदम Paradigm Shift आला आणि त्यांचे रूपांतर विशिष्ट वर्गाचा वेस्टेड असणार्‍या VIEWSPAPAER  आणि VIEWSCHANNEL मध्ये झाले.   
आरक्षणाच्या बाबतीत बोलायचे झालेच तर समाजात आरक्षण विरोधी लाट निर्माण करण्यामध्ये सर्वात मोठा हातभार मिडीयानेच लावला आहे. त्यासाठी एक ना एक अनेत उदाहरणे देता येतील. प्रसारमाध्यमे ज्या बातम्या देतात तेच अंतिम सत्य मानण्याची दर्शकांच्या सायकॉलॉजी चा पुरेपुर वापर केला गेलेला आहे. प्रसारमाध्यमे ही स्वतः आरक्षण विरोधी वातावरण निर्माण करण्यास कशी जबाबदार आहेत, याची कारणमीमांसा अनेक अंगानी करता येईल. याकरता या ठिकाणी जे. एन. यु. चे मास कम्युनिकेशन विभागाचे प्राध्यापक असलेले श्री. दिलीप मंडल यांनी त्यांच्या पुस्तकात केले विश्लेषण मी येथे भाषांतरीत करीत आहे..

       दिनांक २७ मे, वार शनिवार, साल २००६, स्थळ रामलीला मैदान, दिल्ली.
या दिवशी देशाच्या इतिहासातील आत्तापर्यंतचा सर्वात मोठा आरक्षण विरोधी मोर्चा निघाला होता. विशेष म्हणजे हा सारे दिल्लीतील आणि आसपासच्या विद्यार्थ्यांनी
यूथ फॉर इक्वालिटी नावाच्या संघटनेची स्थापना करून या संघटनेच्या बॅनरखाली आरक्षण विरोधी आंदोलन घडवून आणले होते. या  आंदोलनाला दिल्लीसहीत देशभरातील अन्य महानगरांतून मोठ्या प्रमाणावर आलेल्या विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. तत्कालीन युपीए – १ च्या सरकारने देशातील उच्च शिक्षा संस्थांमध्ये ओबीसींना दिलेल्या २७ % आरक्षित कोट्याचा निषेध हा या आंदोलनाचा एकमात्र अजेंडा होता.
       दिनांक २८ मे, वार रविवार, साल २००६, ठिकाण- दिल्ली                           .                                       
आदल्या दिवशीच म्हणजे २७ तारखेला झालेल्या आरक्षण विरोधी महारॅलीला जवळपास सगळ्याच वृत्तपत्रांनी कव्हर केले होते. ते ही अगदी पहिल्याच पानावर हेडलाईन ची जागा देउन. आता त्यांनी ही बातमी देताना वापरलेले शीर्षकं पाहणे             फार औत्सुक्याचे ठरेल.

1.      ANTI-RESERVATION STIR GETS FIERY/Self-Immolation attempted In Cuttack, Delhi-Times of India
2.      Mandal-1 re-run/Medicos to continue stir, hold massive rally- The Statesman
3.      Hope and Despair/Docs still despondent- Hindustan Times
4.      Immolation bid at anti-quota rally-The Tribune
5.      Immolation bids at Delhi. Cuttack/Delhi youth gets 40% burns, cuttack student in ICU/Maha rally in Capital, Docs to intensify stir-The Pioneer
6.      RAGE BURNS HEARTS, LIVES/Anti quota still on, youth who set self in fire alive- The Asian Age
7.      PRESCRIPTION READY/Six new AIIMS before ‘08/MBBS seats doubled to 2400- Indian Express
8.      Tension as rally ends in immolation bid- Express Newsline
9.      Centre orders increase in medical seats/students seek written assurance on this, decide to continue stir- The Hindu
10.  ‘Increase Seats by 55%’/Nine Central Medical Institutes told to follow order in next academic year- Economic Times
11.    आत्मदाह के प्रयास से जाग उठा अतीत/दिल्ली में रहने वाले बिहार के युवक ने लगाई खुद को आग, कटक में एक डॉक्टर ने भी किया आत्मदाह का प्रयास
12.    महारैली में छात्र ने खुद को लगाई आग, आरक्षण विरोधी सरकार पर बरसे- पंजाब केसरी
13.    आरक्षण विरोधियों ने निकाली रैली/ अभी जारी रहेगा मेडिकल छात्रों का आंदोलन-हिंदुस्तान
14.    आरक्षण: दो ने किया आत्मदाह का प्रयास/ गुटखा बेचता है दिल्ली में जलने वाला युवक, उड़ीसा में छात्र को रोक लिया गया
15.    आरक्षण की आग: आत्मदाह पर उतरे आंदोलनकारी/दिल्ली में युवक और कटक में डॉक्टर ने जान देने का प्रयास किया-अमर उजाला
16.    आरक्षण के विरोध में आत्मदाह की कोशिश/प्रधानमंत्री से बातचीत के बाद आंदोलनकारी दुविधा में- दैनिक भास्कर
क्रमशः
( पुढील भागात वृत्तपत्रांत आलेल्या या सगळ्या मथळ्यांवर असलेले विश्लेषण मी सविस्तर रित्या टाकणार असून ह्या सर्व वृत्तपत्रांच्या ऑनलाईन लिंक शोधण्याचा पुरेपूर प्रयत्न करित असून त्या लवकरच उपलब्ध करून देईन )


 
Design by Free WordPress Themes | Bloggerized by Lasantha - Premium Blogger Themes | JCPenney Coupons