आत्तापर्यंतच्या एकुण तीन भागात मी बाबा रामदेव यांच्या संपूर्ण आंदोलनाची रुपरेषा विषद केली. ज्या पद्धतीने सरकाने दडपशाही करून लोकशाहीला निषेधार्ह असणार्या कृत्याचा वापर करून आंदोलन चिरडून काढले त्याचा जाहील निषेध ही केला. पण आत्ता मात्र या एकुण आंदोलनाचे खरे रुप समोर यायला लागलेय. या आंदोलनामागून चालणारी राजकारण्यांच्या अराजकीय खेळीचे चित्र हळूहळू स्पष्ट व्हायला लागलेय.
आमच्या पिढीने (मला येथे ग्लोबलायझेशन नंतर वाढलेली पिढी अपेक्षित आहे.) अनेक उत्कृष्ट वक्ते पाहीले. अव्वल दर्जाचे कम्युनिकेटर पाहीले. पण रामदेव बाबा हे सर्वात हाय क्वालीटीचे, इंप्रेसिव, प्रभावशाली असे कम्यूनिकेटर आहेत. पण त्याहीपेक्षा एक उत्तम मिडीया ऑर्गनायजर म्हटले तर वावगे ठरणार नाही. माझे म्हणणे पटत नसेल तर बाबांनी रामलीला मैदानावर केलेल्या सर्व पत्रकार परिषदा पहा. यु ट्यूब वर पाहून घ्या. मला या बाबतीत माझे मित्र प्रा. दिलीप मंडल यांनी केलेले विधान फार महत्त्वपूर्ण वाटते ते असे की,
“ बाबा दरअसल रामलीला मैदान में एक बड़ा सीन डायरेक्ट करते नजर आते हैँ। बाबा के क्लोज शॉट को जूम आउट करते ही जो चार-पांच चेहरे दिखते थे उसमें पक्के तौर पर कोई मौलाना होता था। बाबा जैसे ही कुछ बोले और भीड़ की प्रतिक्रिया हो, अद्भुत परफेक्शन के साथ भीड़ को फोकस करने वाला शॉट स्विच कर दिया जाता था। न्यूज चैनलों से बेहतर कैमरा डायरेक्शन और स्विचिंग वहां हो रही थी। “
सामान्य वाचक पत्रकारीतेला किंवा पत्रकार परिषदेला कधीच म्हणावा तसा सिरीअसली घेत नाही. कारण जर सिरीअसली घेतले असते तर मिडीया एवढ्या सहजासहजी कदीत कोणाला नॅशनल हिरो बनवू शकली नसती. गेल्या दोन लोकसभांपासून कॉंग्रेस पक्षाने जो दांभिकपणा चालवलाय तो लोकांसमोर एवढा सहजासहजी आलेला नाही. पण प्रेस कॉंन्फरंस हा सिरीअसली घ्यावा असाच विषय आहे. कोणत्याही प्रकारच्या आयोजनामध्ये एक प्रकारचा जूगारच असतो. मटकाच म्हणा हवा तर.. लगा तो तीर नही तो नंगा फकीर... पत्रकार परिषदेला पत्रकारांनी संगनमताने डच्चू दिला तर अख्खे आयोजन पाण्यात जाते. पण जर का पत्रकार परिषद यशस्वी झाली तर ती एखाद्या सभेपेक्षाही जास्त इंम्पॅक्ट क्रिएट करू शकते. पण प्रेस कॉन्फरंसचा वापर प्रत्येकालाच प्रभावीपणे करता येतो असे नाही, जर असे असते तर मुंबई मराठी पत्रकार संघात आठवड्यागणिक शेकडो परिषदा होतात पण सगळ्यांनाच कव्हरेज मिळतेच असे नाही. पण बाबा रामदेव यात एकदम उस्ताद माणूस.
जेव्हा जेव्हा प्रेस कॉन्फरंस बोलावली गेली तेव्हा तेव्हा त्याचा अचूक वापर बाबा रामदेव यांनी केला. प्रेस कॉन्फरंसला आलेले रिपोर्टर अचानक एखाद्या स्क्रिप्ट मध्ये लिहील्या गेलेल्या कॅरेक्टरप्रमाणे वागवले गेले. किंबहूना ते तसे वागतील यासाठी आवश्यक असणारी सारी परिस्थिती निर्माण केली गेली. कॉन्फरंस चालू असतानाच बाबा उपोषणकर्ते आणि पत्रकारांचे प्रश्न अशा दोन्ही आघाड्या लिलया सांभाळत होते. उपोषणकर्त्यांच्या घोषणांचा आवाज मोठा झाला रे झाला की बाबा स्मितहास्य द्यायचे. त्याचवेळी लाँग शॉट वर असलेला कॅमेरा बाबांचा क्लोज अप टिपायचा. या आवाजात कितीतरी वेळा पत्रकारांचे जटील प्रश्न दाबले गेले. प्रश्न विचारत असताना एखादा अडचणीत आणणारा प्रश्न आला की बाबांचे ठरलेले उत्तर तयार असायचे ते असे... “आप लोग आपस में झगड़ा मत कीजिए। आप आपस का झगड़ा आप निबटाओ, मैं तो सरकार से झगड़ रहा हूं। “
क्रमशः
क्रमशः