वामनदादा कर्डक |
जन्म दि. १५ ऑगस्ट १९२२
जन्मस्थळ देशवंडी, ता. सिन्नर, जि. नाशिक
आई सईबाई कर्डक
वडील तबाजी कर्डक
भावंड सदाशीव (थोरला भाऊ)
सावित्राबाई (धाकटी बहीण)
सावित्राबाई (धाकटी बहीण)
पत्नी शांताबाई कर्डक
मुलगी मीरा (जगु शकली नाही)
दत्तक पुत्र रविंद्र कर्डक
- घरची परिस्थिती आणि वडिलांचा व्यवसाय: कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची. मोळया विकणे, टेंभुर्णिच्या पानाचे विडे करुन विकणे आणि हेडीचा व्यवसाय.
- दादांचे लहानपण : गुरं चारणे, जत्रेत कुस्त्या खेळणे, शिवडी येथे गिरणी कामगार, मातीकाम, सिमेंट कॉंक्रिटचे काम, चिक्की विकणे, आईसफ्रुट विकणे, खडी फोडणे, टाटा ऑईल मील मध्ये नोकरी, इत्यादी कामे करत लहानपण गेले.
- छंद :हिन्दी चित्रपट पाहणे, कथाकार, नट होण्याची अभिलाषा, वाचन, 'लल्लाट लेख' या नाटकात घुमा-याची भुमिका केली.
- लेखन :३ मे १९४३ रोजी पहिले विडंबन गीत लिहीले, तेव्हापासून २००४ पर्यंत गीत लेखन व गायनाचा अखंड प्रवास. प्रकाशित आणि अप्रकाशित मिळून साधारणतः दहा हजाराच्या आसपास गीत रचना. उर्दुतील गजल, खमसा, नज्म हे प्रकार मराठीत आणले.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भेट1940 साली नायगांव येथे बाबांचे प्रथम दर्शन, त्यानंतर चाळीसगांव, मनमाड, टिळकनगर येथे बाबासाहेबांच्या स्टेजवर गायन.
पुरस्कार व सन्मान
- दिल्लीची डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशीप.
- राज्य शासनाचा दलीत मित्र पुरस्कार.
- महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी परिनिरीक्षण मंडळावर तीन वर्ष सदस्य.
- महाराष्ट्र शासनाच्या साहित्य आणि सांस्कृतिक मंडळावर सदस्य.
- औरंगाबाद येथे पहिला भव्य नागरी सत्कार (1987).
- प्रा. ऋषिकेश कांबळे संपादित पहिल्या लोकशाहीर वामन कर्डक गौरव अंकाचे प्रकाशन (1987)
- मधुकर भोळे संपादित वामन दादा कर्डक गौरव ग्रंथाचे प्रकाशन (2001)
- प्रा. डॉ. परशुराम गिमेकर संपादित ‘वामनदादा कर्डक यांची गीत रचना’ लेख संग्रहाचे प्रकाशन.
- नाशिक, बुलढाणा येथे नाणेतुला, परभणी येथे प्रख्यात उर्दु शायर बशर नवाज यांचे सोबत वहीतुला, नंतर या वहयांचे गरीब मुलांना वाटप करण्यात आले.
- साहित्य, संस्कृती मंडळाची ‘उत्कृष्ट कविरत्न’ ही गौरववृत्ती.
- युगांतर प्रतिष्ठान तर्फे ‘युगांतर पुरस्कार’ (1997)
- भाई फुटाणे प्रतिष्ठान, जामखेड चा ‘संत नामदेव पुरस्कार’
- बौद्ध कलावंत संगीत अकादमी मुंबईचा ‘भीमस्मृती पुरस्कार’
- भोपाळ येथे ताम्रपट प्रदान.
- भुसावळ येथे चांदीचे मानपत्र प्रदान.
- वसमतनगर जी. हिंगोली येथे ‘स्वरार्हत संगीत संगीती’ च्या वतीने नागरी सत्कार आणि गायन-संयोजक संजय मोहड.
- मराठवाडा ‘अस्मितादर्श पुरस्कार’
- ‘वाटचाल’ (गीतसंग्रह) 1973
- ‘मोहळ’ (गीतसंग्रह) 1976
- ‘हे गीत वामनाचे’ (गीतसंग्रह) 1977
- ‘माझ्या जीवनाचं गाणं’ (आत्मकथन) 1996
पुस्तके
ध्वनीफिती व चित्रपट गीते
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भेट
- भीमज्योत
- जयभीम गीते
- सांगा या वेडीला माझ्या गुलछडिला (सांगते ऐका)
- चल गं हरणे तुरु तुरु (पंचारती)