मागील मे महिन्यात मी पहिल्यांदाच पण्याला गेलो होतो. तारीख २८ एप्रिल २०११. तसा आगदी भीत भीतच गेलो. कारण ही तसेच होते, माझ्या बर्याच पुणेकर मित्रांकडून पुणेकरांच्या खोचक स्वभावाचे आणि पुणेरी पाट्यांचे अनेक रंगवलेले किस्से ऐकलेले होते. म्हणून मनात एक आकस्मिक भीती होती. सकाळी डेक्कन पकडून पुण्याची वाट धरली. आणि शिवाजी नगर ला उतरून पुण्यातला पहिला प्रवेश साजरा केला.
गेल्या वर्षी फेसबुकवर माझी संजय सोनवणी नामक एका हॅप्पी गो लकी काईंड व्यक्तिमत्त्वाशी ओळख झाली. ही ओळख हळूहळू मैत्रीत बदलली आणि कधीही एकमेकांना न पाहताही हे सबंध इतके घट्ट जुळले की आत्ता ह्या माणसाला भेटलेच पाहीजे ही खुणगाठ मनाशी पक्की बांधली.
सकाळी साधारण पावणे अकराच्या सुमारास शिवाजी नगर ला उतरलो ठरल्याप्रमाणे संजयजी मला घेण्यासाठी रेल्वे स्टेशनवर आले होते. पहिली भेट झाली आणि अक्षरशः आश्चर्याचा धक्काच बसला. स्वतःच्या नावावर ७२ हून अधिक पुस्तके, अनेक नानाविध उद्योगधंदे नावावर असलेला हा माणुस इतका साधा सरळ सोपा कसा असू शकतो याचे नवल वाटले. रिक्षा धरली आणि कोथरूडला त्यांच्या घरी पोहोचलो. घरातल्या सर्व सदस्यांची ओळख करवून दिली आणि ज्या कामानिमित्त त्यांच्याकडे गेलो होतो त्याविषयी चर्चा सुरू झाली. गप्पांच्या ओघात वेळ कधी संपला याचे मला भानच उरले नाही.
पण एक मात्र निश्चित हा संजय सोनवणी नावाचा माणुस कसा मोठ झाला, लोकोत्तर कार्यासाठी आपली स्वतःची आर्थिक, सामाजिक, बौद्धिक संप्पत्ती कशी पणाला लावली ह्याची हकीकत ऐकताना अक्षरशः अंगावर काटा उभा राहीला. मी जास्त काही सांगणार नाही कारण जर सगळे काही आत्ताच सांगून टाकले तर तुम्ही त्यांना भेटल्यावर तुम्हाला बसणारा SURPRIZE SHOCK ची मज्जा मला आत्ताच घालवायची नाहीये. आणि संजयजी YOU R LIKE BIG BROTHER FOR MEE.
संजय सोनवणी (जन्म १४ ऑगस्ट १९६४): मराठीतील आधुनिक काळातील महत्वाचे साहित्यिक तत्वज्ञ, कवी आणि संशोधक. त्यांनी मानवी जीवनाच्या असंख्य पैलूंना विविध साहित्यप्रकारांद्वारे हात घालत जी साहित्य रचना केली आहे तीला भारतीय साहित्यात तोड नाही. वर्तमानातील सामाजिक प्रश्नांवर सडेतोड भूमिका घेण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यामुळे ते अनेकदा वादग्रस्तही ठरले आहेत. त्यांचा "नीतिशास्त्र" हा नैतिक समस्यांबद्दलचा, आधुनिक परिप्रेक्षात वैज्ञानिक दृष्टीकोनातून केलेल्या चिंतनपर ग्रंथ हा त्यांच्या बौद्धिक आणि तात्विक उंचीचा परिचय करून देतो. त्यांच्या कादंब-यांनी मराठी साहित्याला नवी परिमाणे मिळवून दिली आहेत.
जळगाव येथे सोनवणींचा जन्म झाला असला तरी त्यांचे वडील श्री देविदास सोनवणी हे प्राथमिक शिक्षक असल्याने सतत बदल्या होत असल्याने त्यांचे प्रारंभिक जीवन भटकण्यातच गेले. शेवटी वडिलांनी पुणे जिल्ह्यात बदली करुन घेतली. शिरुर तालुक्यातील वरुडे, गणेगाव, चिंचोली, कन्हेरसर आणि शेवटी पाबळ येथे स्थलांतरे झाली. या काळात दूर्दैव व दारिद्र्याचे असह्य चटके सहन करत त्यांनी राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातुन बी. कॉम ही पदवी प्रथम श्रेणीने पास होऊन मिळवली. पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले व दै. आज का आनंद या हिंदी वृत्तपत्रात पत्रकारितेचे काम करत एम.कॉम ही पदवीही प्रथम श्रेणीत प्राप्त केली. त्यानंतर ते व्यावसायिक जीवनात पडले. रु. ५०००/- च्या भांडवलावर सुरुवात करत त्यांनी नंतर अनेक उद्योग स्थापन करून आपला स्वतंत्र ठसा उमटवला. वयाच्या ३१ व्या वर्षी ते २ लिस्टेड कंपन्यांचे संस्थापक अध्यक्ष बनले. लोहभुकटी बनवणारा स्वयंशोधित पद्धतीचा अंगिकार करणारा भारतातील पहिला उद्योग त्यांनी गडचिरोलि या नक्षलवादी भागात उभारुन सामाजिक दायित्वाचेही भान दर्शवले. त्यानंतर त्यांनी लेह (लद्दाख) येथेही फळप्रक्रिया उद्योग उभारण्याचा प्रयत्न केला. पुष्प प्रकाशन लि. या संस्थेमार्फत त्यांनी ८५० पेक्षा अधिक पुस्तके प्रसिद्ध केली. वाशिंग्टोन सोफ्टवेयर लि. या कंपनीमार्फत त्यांनी २८ स्वत:चे स्वामित्व हक्क असणारी उत्पादने जागतिक बाजारपेठेत आणली. या सर्व आघाड्या जवळपास एकाकी लढत असतांना त्यांच्या फसवणुकीही झाल्या. त्य्याबाबत आवाज उठवत असता काही हितशत्रूंनी त्यांच्या बदनामीची मोहिम सुरू करत, राजकीय दबाव आणुन खोटे गुन्हेही दाखल करवुन त्यांना पराकोटीचा मन:स्ताप दिला. या सा-याचा परिपाक म्हणजे स्वत: उभारलेले साम्राज्य २००४-०५ या काळात डोळ्यादेखत गडगडतांना त्यांना पहावे लागले.
साहित्य प्रवास: सोनवणींनी लिहायला सुरुवात केली तेंव्हा ते अवघे ११ वर्षांचे होते. "फितुरी" हे नाटक त्यांनी लिहिले. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी पहिली बालकादंबरी लिहिली (नरभक्षकांच्या बेटावर) जी नंतर मेहता पब्लिशिंग हाउसने प्रकाशित केली. त्यांच्या असंख्य कथा तत्कालीन महत्वाच्या मासिकांतुनही प्रसिद्ध होत राहिल्या. राज्य शासनाच्या अनुदानाने त्यांचा पहिला कवितासंग्रह "प्रवासी" प्रसिद्ध झाला. त्यानंतर त्यांच्या विविध पार्र्स्वभुमी व विषयांवरील कादंब-या प्रसिद्ध होत राहिल्या. मराठीत राजकीय थरार हा कादंबरीप्रकार सर्वप्रथम त्यांनीच आणला. "म्रुत्युरेखा", "रक्त हिटलरचे", बीजींगच्या वाटेवर" अशा अनेक कादंब-या गाजल्या...इंग्रजीतही अनुवादित होवुन त्या जगभर गेल्या. क्लिओपात्रा या ऐतिहासिक कादंबरीने त्यांची वेगळीच ओळख निर्माण झाली. या काळात त्यांनी अनेक नाटकेही लिहिली...त्यातील काहींचे प्रयोगही झाले. सव्यसाची या कादंबरीने इतिहास घडवला. पण त्यांच्या कल्की, शुन्य महाभारत, कुशाण, ओडीसी आणि यशोवर्मन या तत्वचिंतनाने डूबलेल्या, मानवी जीवनाचे गुढ आणी व्यामिश्र पट उलगडुन दाखवणा-या कादंब-यांनी तत्वचिंतक लेखक असा मान त्यांना मिळवून दिला. कुशाणचा अनुवाद इंग्रजीत "Last of the wanderers" आणि यशोवर्मनचा "The Jungle" प्रसिद्ध झाले आणि साहित्यसमिक्षकांनी त्यांची वाहवा केली. त्यांनी मुळ इंग्रजीतही लेखन केले असून "The Awakening" या म्रुत्युच्या गुढ आकर्षणाने आणि त्यावरील विजयासाठी अविरत प्रयत्न करणा-या मानवजातीचे प्रतिनिधित्व करणा-या राणी शीबाला केंद्रिभुत धरून हा सनातन संघर्ष चित्रित करणा-या कादंबरीचे लेखन केले. तो प्रसिद्धही झाला. या कादंबरीचा मराठी अनुवादही प्रसिद्ध आहे. याशिवाय त्यांनी विश्वनिर्मितीबाबतचा स्वतंत्र भारतीय सिद्धांत सिद्ध केला आणि तो "अवकाश ताण सिद्धांत आणि विश्वनिर्मिती" या शिर्षकाने प्रसिद्ध झाला. मराठीत भौतिक संशोधनात्मक असा हा एकमेव ग्रंथ आहे. याशिवाय त्यांनी धर्मेतिहासावर "हिंदू धर्माचे शैव रहस्य" आणि "विट्ठलाचा नवा शोध" हेही अभिनव ग्रंथ सिद्ध केले. ते गाजलेही कारण त्यांत धर्मेतिहासाची नवी दिशा संशोधित व दिग्दर्शित केली गेली आहे. त्यांच्या "पर्जन्य सुक्त" या काव्याचा इंग्रजीत अनुवाद झाला आणि त्यातील निवडक ८ कवितांना संगीतबद्ध करून त्याची ध्वनीफीतही प्रसिद्ध झाली. त्यांची "असुरवेद" ही अलीकडेच प्रसिद्ध झालेली सांस्कृतिक थरारकथा गाजते आहे. परंतु त्यांचे अलीकडील सर्वात महत्वाचे साहित्यिक कार्य म्हणजे त्यांची "...आणि पानिपत" ही कादंबरी. जनसामान्यांच्या द्रुष्टीकोनातुन १६८० ते १७६१ हा काळ चितारलेली ही कादंबरी मराठीतील पहिली subaltern कादंबरी आहे.
योगदान: परकीय कल्पनांवर आधारित काल्पनिक कादंब-यांचे पेव फुटले असतांना सोनवणींनी स्वतंत्र प्रतिभेने आपल्या साहित्य रचना सिद्ध केल्या. वाचकांना जीवनाकडे पाहण्याची नव्य वैश्विक द्रुष्टी दिली. जातींयतेच्या दुष्टचक्रात अडकलेल्या साहित्य विश्वात त्यांनी प्रथमच फक्त मानवतावादी द्रुष्टीकोन घेत जवळपास सर्वच जाती-धर्माच्या लोकांना आपल्या साहित्यात सन्मानाचे स्थान देत जाती-भेदातीत साहित्याची निर्मिती केली. त्यांचे नायक सर्व स्तरातील आहेत. पण त्यांना जातीयतेचे मुल्य न देता प्रत्येकाच्या ह्रुदयात अवशिष्ट का असेना, मानवतेचे आणि वैश्विकतेचे उच्च स्थान दिले.
उद्योग जगताला त्यांनी दिलेले योगदानही महत्वाचे आहे. गडचिरोलीसारख्या आदिवासी आणि नक्षलवादाने ग्रस्त अशा भागात उद्योग उभारुन त्यांनी उद्योजकांचे विकेंद्रित विकासासाठी कसे योगदान असायला हवे याचा आदर्ष घालुन दिला. स्वत: संशोधन करत धातु-भुकटी विद्न्यानात (Powder metallurgy) मोलाची भर घातली. मराठी मानसाला उद्योगधंद्यात येण्याची अविरत प्रेरणा दिली.
पुरस्कार: पुरस्कारांसाठी लेखकाने पुस्तके पाठवणे हा लेखकाचा अपमान आहे असे त्यांचे ठाम मत असल्याने त्यांनी स्वत:वर आणि त्यांच्या प्रकाशकांवर "पुरस्कारांसाठी पुस्तके पाठवायची नाहित." असे बंधन घातल्यामुळे त्यांना एकही साहित्य पुरस्कार मिळालेला नाही. औद्योगिक विश्वातील कामगिरीमुळे मात्र त्यांना आंतरराष्ट्रीय व्यवसाय उत्क्रुश्ठता ते इंदिरारत्न असे जवळपास ८ पुरस्कार मिळालेले आहेत.
संजय सोनवणी: प्रकाशित साहित्य
थरार-कादंबर-या:
- म्रुत्युरेखा (५ आव्रुत्त्या),
- विश्वनाथ (२ आव्रुत्त्या),
- अंतिम युद्ध (२ आव्रुत्त्या)
- ब्लडी आयलंड,
- शिल्पी (२ आव्रुत्त्या),
- रक्तराग (२ आव्रुत्त्या),
- महाद्वार (२ आव्रुत्त्या),
- अंतिम युद्ध (२ आव्रुत्त्या),
- वार टाईम (२ आव्रुत्त्या),
- पराभव (३ आव्रुत्त्या),
- अपहरण (४ आव्रुत्त्या),
- सांस्क्रुतीक थरार: असुरवेद (२ आव्रुत्त्या)
- वैद्यकीय कादंबरी: थेंब...थेंब म्रुत्यु...(३ आव्रुत्त्या)
- राजकीय थरार:
- बिजींग कोन्स्पिरसी (२ आव्रुत्त्या),
- रक्त हिटलरचे, (३ आव्रुत्त्या),
- ब्लकमेल,
- डेथ ओफ़ द प्राइममिनिस्टर (४ आव्रुत्त्या),
- राजकीय उपहास:
- गुड्बाय प्राइममिनिस्टर,
- आभाळात गेलेली मानसं (३ आव्रुत्त्या)
- ऐतिहासिक कादंब-या
- अखेरचा सम्राट (२ आव्रुत्त्या),
- ...आणि पानिपत, कुशाण (२ आव्रुत्त्या)
- क्लीओपात्रा (७ आव्रुत्त्या)
- तत्वज्ञानात्मक कादंबर्या:
- शुन्य महाभारत (२ आव्रुत्त्या),
- कल्की (३ आव्रुत्त्या),
- यशोवर्मन (४ आव्रुत्त्या)
- सामाजिक कादंबर्या:
- सव्यसाची (२ आव्रुत्त्या),
- काळोख (२ आव्रुत्त्या),
- खिन्न रात्र (३ आव्रुत्त्या),
- विकल्प (३ आव्रुत्त्या),
- खळबळत्या सागरकाठी (२ आव्रुत्त्या),
- अखेरचे वादळ (३ आव्रुत्त्या),
- पौराणिक कादंब-या:
- अश्वत्थामा (६ आव्रुत्त्या),
- ओडीसी (३ आव्रुत्त्या)
- वैज्ञानिक संशोधन:
- अवकाश ताण सिद्धांत आणि विश्वनिर्मिती
- तत्वज्ञान:
- नीतिशास्त्र
- ब्रह्मसुत्र रहस्य
- इतिहास संशोधन:
- हिंदु धर्माचे शैव रहस्य
- विट्ठलाचा नवा शोध,
- सामाजिक/वैचारिक:
- मुंबई २६/११...पुर्वी आणि नंतर
- प्रेम कसे करावे?
- सद्दाम हुसेन: एक झंझावात
- ब्राह्मण का झोडपले जातात?
- भारतीय ब्राह्मणांचे भवितव्य
- ब्राह्मण पुर्वी कोण होते?
- कोर्पोरेट विलेज: एक गांव:एक कंपनी:एक व्यवस्थापन,
- काव्य संग्रह:
- प्रवासी
- पर्जन्यसुक्त
- संतप्त सुर्य
- नाटक:
- मीच मांडीन खेळ माझा
- राम नाम सत्य हे
- विक्रमादित्य
- रात्र अशी अंधारी
- गड्या तु माणुसच अजब आहेस
- त्या गावाचं काय झालं?,
- बाल/किशोर साहित्य:
1. रानदेवीचा शाप
2. साहसी विशाल
3. रे बगळ्यांनो
4. सोन्याचा पर्वत
5. दुष्ट जोनाथनचे रहस्य
6. रत्नजडीत खंजिराचे रहस्य
7. सैतान वज्रमुख
8. अंतराळात राजु माकड
- इंग्रजी:
- Death of the prime minister
- On the brink of Death
- The mattalions
- The Jungle
- Last of the wanderers
- The Awakening
- Dancing with the Rains
- Raging Souls
- Heart of the Matter (full length play)
- Monsoon Sonata (Poetry)
अन्य:
१) चित्रपट: अमानुष: एक थरार
अखेरचे वादळ (निर्माणाधीन)
२) संगीत: मनात माझ्या (गीत-संगीत-गायन), ओ जानेजां (गीत-संगीत. गायक- नितीन मुकेश), इट्स माय ड्रीम (संगीत-गीत)
संकीर्ण: किर्लोस्कर ते अन्य अनेक मासिकांत शंभरेक वैचारिक लेख.