Monday, May 9, 2011

Dr. Aruna Pendse

माझ्या एम. ए. च्या पहिल्या वर्षाची फर्स्ट सेमिस्टर पार पडली होती. सुट्ट्या सुरू झाल्यापेक्षा पब्लिक Admin चे टेँशन संपल्याचे भाव माझ्या मित्रांपैकी जवळपास सगळ्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होते. पण चैतन्य च्या चेहर्‍यावर दिसणारे भाव मात्र फारच ठळक होते. आदल्या रात्रीच चैतन्य आणि मी दोघांनी फोनवर बोलताना पब्लिक Admin मध्ये असलेल्या सगळ्या थेअरी आणि त्या थेअरी देणार्‍यांच्या नावानं आधीच बोटे मोडून झाली होती. चला असो... 
डोळ्यांवर दाटून आलेल्या झोपेला सन्मान देत एकमेकांचे निरोप घेतले ते पुढच्या सेमीस्टरला भेटण्यासाठीच. ३ जानेवारी २०११ ला डिपार्टमेंट सुरू झाले. नव्या सत्रात नवे विषय, नवा अभ्यासक्रम आणि ते शिकवण्यासाठीचे नवे प्राध्यापक. त्यात IGP म्हणजेच इंडियन गव्हर्मेंट अॅंड पॉलिटिक्स पेपर -२ आम्हाला डॉ. अरुणा पेंडसे घेणार होत्या. हे ज्या वेळेस मला आणि इतरांना माहीत पडले तेव्हा आमच्यापैकी बर्‍याच जणांना अनामिक टेंशन आलं, आणि त्याला करणे पण तशीच होती.

अमृता मुधोळकर, माझी वर्गमैत्रीण आणि डॉ. पेंडसे यांची भाची; तिने आधीच सांगून ठेवले होते माझी आत्या खुप डिसीप्लीन पसंत करणारी आहे. भरीस भर म्हणून सिनीयर्स नी आधीच सुचना देऊन ठेवली होती की दुनियादारी झाली तरी चालेल पण अटेंडंस रेग्युलर राहूद्या रे. पण लेक्चर ला जा मनापासून एंजॉय कराल हा अनुभव सुद्धा ते शेअर करायला विसरले नाहीत. माझ्याबाबतीत सांगायचे झाले तर मी एक नंबरी मुडी कॅरेक्टर आहे, अगदी लहरी स्वभाव. मनात जे येईल ते बिनधास्तपणे करायचे मग परिणामांची पर्वा करत बसायची नाही. असो...  

 एव्हाना डिपार्टनेंटमध्ये चार महिने होउन गेले होते.  पेंडसे मॅडम आज पहिले लेक्चर शार्प दिड वाजता सुरू करतील असा निरोप अमृताने आम्हा सगळ्यांना दिला तेव्हा १२.३० वाजलेले होते आणि मी मंगेश सोबत बँकेत होतो. मेसेज मिळाल्या मिळाल्या बँकेचे काम लवकर पूर्ण होण्यासाठी तगादा लावू लागलो पण ते काही झाले नाही. त्याची परिणीती मॅडमच्या पहिल्याच लेक्चर ला चक्क मी आणि मंगेश २० मिनीटे उशीरा पोहोचलो. त्यावेळी त्यांनी काही न बोलता वर्गात येऊ दिले. पहिल्या लेक्चर मध्ये त्यांनी पूर्ण सत्रात एकुण अभ्यासक्रमाची त्यांनी ठरविलेली रुपरेषा आणि त्यांची होणारी एकुण अंमलबजावणी व ती होत असताना दररोज लेक्चर ला येण्याआधी काय काय तयारी कश्या पद्धतीने करावयाची आहे याची माहीती दिली आणि तास संपवला. म्हटलं बरं झालं बाबा , आज उशीरा आलो पण मॅडम काही रागावल्या नाहीत म्हणून थोडं हायसं वाटत होतं. १ वाजता होणार्‍या लंच ब्रेकमध्ये अर्धा तास नेहमी अपुरा पडायचा मग काय रोज दिड वाजताच्या लेक्चरला अजाणतेपणी दहा ते पंधरा मिनीटे उशीर होत होता. कॅंटीनमध्ये जाताना आमचा अख्खा ग्रुप एकत्र जायचा आणि लेक्चरला येताना उशीराही एकत्रच यायचा. सुरूवातीचे तीन चार दिवस असेच चालले, किंबहूना मॅडमनी ते चालवून घेतले असेच म्हणावे लागेल. मात्र एके दिवशी मॅडमनी चांगलीच तंबी दिली त्या दिवसापासून आण्ही सारे सुतासारखे सरळ .. मला आठवत देखील नाही की कोणी त्यानंतर कधी उशीरा आले असेल. हा झाला मॅडमनी आम्हाला लावलेल्या शिस्तिचा भाग .... पण यानंतर मात्र त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळाच पैलू आमच्यासमोर आला आणि त्याचा प्रभाव हा खाणीतून काढलेल्या ओबडधोबड हिर्‍यावर पडणार्‍या पैलूसारखा होता.  
इंडियन गव्हर्मेंट  &  पॉलिटिक्स हा विषय शिकवताना त्यांनी नेहमीच स्वतःचा असा आग्रह धरला. शिकवताना आपण ज्यांच्यासाठी हे शिकवतोय त्यांना ते समजलेच पाहीजे असा त्यांचा नेहमीच आग्रह होता. जागतिकगकरणाच्या व्याख्या समजावून सांगताना आत्ताच्या मल्टिनॅशनल कंपन्या म्हणजे काय? आणि ब्रिटिशांनी जबरदस्तीने लादलेली ईस्ट इंडिया कंपनी ही एक मल्टिनॅशनलच होती, त्याशिवाय भारताला ग्लोबलायझेशन हा १६ व्या शतकापासूनच कसे परिचित असल्याचे कंसेप्ट मॅडमनी जेव्हा वर्गात क्लिअर केली तेव्हा नेमके आपण आणि आपली समीक्षा ही किती पाण्यात आहे हे जाणवले. २१ व्या शतकातल्या पहिल्या दशकाला निरोप दिलेला असताना जागतिकीकरणाने आपले पाय कसे प्रत्येक क्षेत्रात पसरवले आहेत आणि त्यावर आम्ही चर्चा करताना मांडत असलेले मुद्दे हे किती उथळ आणि बालीश होते हे त्या एका उदाहरणाने जाणवून दिले. त्याचवेळी खाडकन डोक्यात प्रकाश पडला आणि जाणवले की पेंडसे मॅडमचे प्रत्येक लेक्चर हे त्या त्या विषयावरील सांगोपांग पद्धतीने, योग्य समतोल राखलेली आणि प्रदिर्घ अनुभव असलेली एक उत्कृष्ट समीक्षा आहे आणि त्या समीक्षेचे आकलन करणे हे कोणासाठीही अत्यंत अनमोल असा ठेवा आहे. मला तरी आठवत नाही की त्या दिवसाच्या अनुभवानंतर मी कधी ठरवून किंवा शक्य नसतानाही लेक्चर बंक किंवा मीस केलयं.. बिल्कूल नाही.
त्यांचा वर्गात शिकवलेला प्रत्येक तास प्रत्येक विषय, त्यामागची राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि तत्कालीन परिस्थितीचा मागोवा घेऊन केलेल्या विवेचनाला कुठेच तोड नाही. वर्गात बसणार्‍या आणि त्यातल्या त्यात जे विद्यार्थी मराठी माध्यमातून आहेत त्या प्रत्येकाला विषय कळलाय की नाही याची वैयक्तिक विचारपूस करणार्‍या त्याच होय. त्याच विद्यार्थ्यांना सगळे स्टडी मटेरीअल मराठीत उपलब्ध आहे की नाही याची खातरजमा करून घेउन ते नसल्यास स्वतः उपलब्ध करून देत .. आत्ताही देतातच..
वर्गात कोणी कोणत्याही भाषेत बोलणारा असो लोकशाहीचे पालमन करताना प्रत्येकाला त्याच्या सोयीच्या भाषेत मुद्दा मांडायला देणार्‍या, आरक्षणासारखा ज्वलंत प्रश्नावर चर्चा करायाला उद्युक्त करताना त्या विषयी एक बॅलंस्ड अॅप्रोच ठेवून सुत्रसंचालन करताना योग्य मुद्दयांची निवड आणि योग्य समीक्षण कसे असावे याचे अप्रत्यक्ष धडे आपल्याकडूनच मिळाले आहेत. वर्गात मॅडमनी ज्या सहजतेने क्लोज्ड आईज (Closed Eyes) आणि ओपन आईज (Open Eyes)  मधले अंतर समजावून सांगितले त्यामुळे मुद्दयांचे महत्त्व जाणून कोणत्या मुद्द्याकडे लक्ष पुरवावे आणि कोणाला दुर्लक्षित ठेवावे हे नीट कळू शकले.    
माझ्या आठवणीत आणि सगळ्यात भावूक करणारा प्रसंग असा ..
मी मॅडमकडे सहज एक शंका आली म्हणून विचारायला गेलो, मॅडम मला तो डंकेल ड्राफ्ट नावाचा प्रकार काही कळाला नाही जर, आपल्याकडे मराठीत काही साहित्य उपलब्ध असेल तर?”  मला पुढचे काही बोलू द्यायच्या आतच मॅडम फटकन उठल्या त्यांच्या कपाटात असलेली, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी डंकेल ड्राफ्ट आणि तत्सम प्रकणांवर प्रकाशीत झालेले पण बर्‍याच ठिकाणि अभावाने उपलब्ध असलेली सर्व पुस्तके माझ्या हातात दिली. मी लागलीच त्याची एक यादी बनवून मॅडमकडे सुपूर्द केली. सहा दिवसांनी सगळी पुस्तके परत केली, त्यावर त्यांनी मला दोम प्रश्न विचारले
1.       सगळी पुस्तके वाचली का ? हो म्हणालो ..
2.       सगळ्या शंकांचं निरसन झालं का ? उत्तर हो असचं होतं ...

दोन्ही उत्तरे ऐकताच त्यांचा रिप्लाय होता.. चला माझ्यासाठी ह्या पुस्तकांना जपून ठेवल्याची आणि त्यांना विकत घेतल्याची जी किंमत होती ती वसूल झाली  हे ऐकता क्षणी काही दिवस आठवले ज्यावेळी आमचे मास्तर म्हणायचे पोरांनो वार्षिक परिक्षा संपली ना आत्ता तुमच्या वह्या द्या मला .. त्या त्यांना रद्दीत विकायच्या असत. हा जबरदस्त विरोधाभास लक्षात येताच मला असे शिक्षक लाभल्याचा खुप अभिमान वाटू लागला.

आमच्यासोबत चॉकलेट डे साजरा करताना अख्ख्या वर्गाला चॉकलेट वाटून आमच्या आनंदात सहभागी होतानाही त्या स्वतः आमच्यातल्या होउन जात. पण त्या दिवशी मी, चैतन्य आणि मंगेश आणिही तिघांनीच खिशात भरता येतील तेवढी चॉकलेट्य भरली आणि पार्ट २ वाल्यांच्या तोंडाला पाने पुसली.
असे अनेक छान छान अनुभव आहेत. पण ते अनुभव असे सांगताना मजा नाही येणार तुम्ही स्वतः याचा अनुभव घ्या म्हणून येथेच थांबलेले बरे ...


 
Design by Free WordPress Themes | Bloggerized by Lasantha - Premium Blogger Themes | JCPenney Coupons