Friday, July 8, 2011

आरक्षण भाग १५

                       
                   गेल्या भागातील अनुलोम आणि प्रतिलोम विवाद या संज्ञाचा अर्थ विचारणारे बरेचसे फोन येवून गेले त्यानिमित्ताने ह्या भागाची सुरूवात करताना या दोन संज्ञाचा अर्थ समजावून सांगणे संयुक्तिक ठरेल.
 जेव्हा वैदीक आर्य धर्माचा पाया रचला जात होता त्याच काळात धर्मसंस्थेचा देखील पाया रचला जात होता. धर्मसंस्थेचा पाया रचला जात असतानाच समाजातील एका विशिष्ट वर्गाचा आणि विशिष्ट समुहाचे वर्चस्व कायम राहील हे हेतुपुरस्सर पाहिले गेले. त्या अनुषंगाने सोयास्कर अशा रिती रिवाजांना आणि व्यवस्थेला जन्माला घातले. अनेक सिद्धांत तयार केले गेले. आणि हे सिद्धांत केवळ दोन नियमांवर आधारित आहेत.
1.       आंतर्विवाह
आणि
2.       बहिर्विवाह
आंतर्विवाहः-
आपल्या आयुष्यात इष्ट साथीदाराची निवड करण्यासाठी आपल्याच जातीतील किंवा जातीसमुहातील एखाद्या पोटजातीतील जोडीदार निवडणे. या प्रकारच्या विवाहपद्धतीत केवळ ह्याच प्रकारे जोडीदाराची निवड करण्याचे स्वातंत्र्य असते. आंतर्विवाहातंर्गत दोन अन्य उपप्रकार येतात ते म्हणजे जातिय अंतर्विवाह आणि  उपजातिय अंतर्विवाह.

जातिय अंतर्विवाह: इस नियम के अंतर्गत एक व्यक्ति को अपनी जाति के अंतर्गत ही विवाह करने की छूट है। कोई व्यक्ति अपनी जाति के बाहर विवाह नहीं कर सकता। इस नियम को नहीं मानने वाले व्यक्ति को जाति पंचायत के द्वारा सामाजिक एवं आर्थिक रूप से कठोर दंड दिया जाता है। दंड के फलस्वरूप व्यक्ति के साथ जातिगत सहयोग और सुरक्षा के हर दरवाजे बंद कर दिए जाते हैं और उसे जाति से बहिष्कृत कर दिया जाता है।
1.       जातिय अंतर्विवाह: जातीय अंतर्विवाह या पद्धतीत त्या- त्या जातीतील व्यक्तीला त्याच्या जातीतील व्यक्तिशीच विवाह करण्याचे धार्मिक स्वातंत्र्य बदाल केले असते. ह्या धार्मिक नियमांना न जुमानता त्या विरोधात कृत्य करणार्‍या किंवा जातीय अंतर्विवाहाचे नियम मोडणार्‍या व्यक्तिला जातपंचायती मध्ये दोषी ठरविले जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळातही उघडकीस आलेल्या अनेक प्रकरणांमध्ये जात पंचायतींकडून दोषी ठरविण्यात आलेल्या पिडीतांना सामाजिक आणि आर्थिक पातळ्यांवर बहिष्कृत करण्याचे दुष्कृत्य देखील केले गेले आहे. ह्या बहिष्कारामध्ये सर्व प्रकारच्या सोयी सुविधा, जातीअंतर्गत सहयोग. सामाजिक सुरक्षा आणि सामाजिक हक्कांपासून वंचित ठेवण्याच्या शिक्षेचा समावेश केलेला आहे.

2.       उपजातिय अंतर्विवाहः- जातीय अंतर्विवाहासारखा हा जाचक नियम नाही. प्रत्येक जातींत किंवा धर्माधिष्ठित वर्गांमध्ये असलेले अनेक वर्ग किंवा उपवर्ग तसेच जाती आणि उपजातीं यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. प्रत्येक वर्ग किंवा तत्सम जाती ह्या अनेक उपवर्गांचा एक समुह असतात. प्रत्येक जातीत अनेक उपजाती आठळून येतात. ह्या उपजाती त्या त्या वर्गात असणार्‍या तुलनात्मक श्रेष्ठतेच्या पातळ्यांवर स्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्याच्या चढाओढीत निर्माण झालेल्या संघर्षांच्या अनेक घटना आपणास पहावयास मिळतात. उदाहरणादखल घ्यायचे झालेच तर उत्तर प्रदेशात ब्राम्हण आणि त्यासमान किंवा त्याखालोखाल येणारे कायस्थ यांच्यात जरी सलोख्याचे वातावरण नसले तरी ह्या दोन्ही समुदायांत रोटी- बेटी व्यवहार चालतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात स्वतःला ९६ कुळी समजणारे मराठे हे कुणबी मराठ्यांची ९२ कुळी म्हणून हेटाळणी करतात. शिवाय पंचकुळी, सप्तकुळी, बारामाशी – अक्करमाशी हे भेद देखील आहेत. ह्यां सर्व वर्गांत रोटीव्यवहार नित्याचा असला तरी रोटी-बेटी व्यवहार फार अभावानेच आढळून येतो. परंतू एखादा उपजातिय अंतर्विवाह जरी घडून आला तरी त्यास जातीय अंतर्विवाहाचे नियम मोडल्यावर देण्यात येणार्‍या वागणुकीचे जराही अनुकरण केले जात नाही हे विशेष ...

बहिर्विवाह :
बर्हिविवाह पद्धतीतील नियमांनुसार समुहातील प्रत्येक व्यक्तिला आपल्या समुहाबाहेरील व्यक्तिशी विवाह करणे बंधनकारक असते. वरकरणी पाहता , अंतर्विवाह आणि बहिर्विवाह ह्या दोन्ही पद्धतीतील नियम परस्परविरोधी दिसत असले तरी ते परस्पर पुरक असल्याचे त्याच्या खोलात गेलल्यावर कळून येईल. हिंदू समाजातील विवाह पद्धतीअंतर्गत असलेल्या बहिर्विवाह पद्धतीत दोन उपपद्धती आहेत.
·         सगोत्र बहिर्विवाह:
·         सपिण्ड बहिर्विवाह:
 
1.       सगोत्र बहिर्विवाह:
सगोत्र बहिर्विवाह पद्धतीअगोदर गोत्र ही संकल्पना समजून घेणे महत्त्वाचे ठरेल. एक समान गोत्र असणार्‍या दोन किंवा अनेक व्यक्ती ह्या सगोत्रीय व्यक्ती म्हणून ओळखल्या जातात. गोत्र हा एका वंश समुहाला किंवा एका परिवाराचा समुह म्हणून देखील ओळखले जाते. समान गोत्र असणार्‍या व्यक्ती ह्या आपआपसात विवाह करु शकत नाहीत. समगोत्रीय व्यक्ती ह्या एकाच कुंटूंबातील मुळपुरूषाचे वंशज असल्याने त्यां दोघांमध्ये सक्त संबंध असल्याची धारणा यामागे आहे. परंतू १९५५ साली अस्तित्वात आलेल्या हिंदू विवाह अधिनियम, १९५५ ने सगोत्र बहिर्विवाह पद्धतीतील नियमांना जवळपास निष्प्रभ करून टाकले.

   
2. सपिण्ड बहिर्विवाह:सपिण्ड बहिर्विवाह हा एक सगोत्र पद्धतीसारखाच परंतू त्याहून थोडासा वेगळा असा नियम. सपिण्ड व्यक्ती ह्या एकमेकांचे रक्तसंबंधी असल्याचे मानले जाते. पित्याच्या कुटूंबाकडून सात पिढ्या आणि आईच्या कुंटूंबाकडून आलेल्या पाच पिढ्या ह्या सपिण्ड किंवा रक्त संबंधी असल्याचे मानले जाते किंवा तसे म्हणवले जाते. या पद्धतीअंतर्गत व्यक्ती ही तिच्या सपिण्ड नातेवाईकाशी विवाह करु शकत नाही. हिंदू विवाह अधिनियम, १९५५ हा अशा प्रकारच्या रुढी पाळण्यास मज्जाव करतो. त्याचे एक चांगले उदाहरण आपल्या महाराष्ट्रात पाहता येईल. महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील काही भागांमध्ये मामाची मुलगी आणि आत्याचा मुलगा यांत अंतर्गत विवाह करण्याची पद्धत आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या अदजी किंवा पिढ्यांची संख्या लक्षात घेतली जात नाही.  आत्ता आपण सपिण्ड या शब्दाचा शब्दशः येणारा अर्थबोध पाहुयात
सपिण्ड हा शब्द मुळात दोन मुख्य कारणांसाठी प्रचलित आहे ते पुढीलप्रमाणे
·         कालवश पूर्वज आणि आत्ताचे जीवीत वंशज यांच्यात असलेले समान पिण्ड हे सपिण्ड
·         आणि मृत पूर्वजांचे एकसोबत पिण्ड करणारा सपिण्ड
अंतर्जातीय विवाह :
आंतरजातीय विवाहः-
आंतरजातीय विवाह पद्धतीत कोणत्याही प्रकारचा जातिभेद पाळला जात नाही. उदा. ब्राम्हण स्त्री ही चांभार जातीतील पुरुषाशी देखील विवाह करू शकते.  अशा प्रकारच्या विवाह पद्धतीला आंतरजातीय विवाह पद्धती म्हणतात. बदललेल्या कालानुसार नव्याने रुजलेल्या मानवी नैतिक मुल्यांमुळे शहरी भागांत ही प्रथा बर्‍याच अंशी मागे पडली आहे.
क्रमशः





 
Design by Free WordPress Themes | Bloggerized by Lasantha - Premium Blogger Themes | JCPenney Coupons