Wednesday, January 11, 2012

कायम उपेक्षिला

गांधी चौकातला टिळकांचा पुतळा ..
उत्तरेला नवरोजी मार्ग ..
दक्षिणेला सय्यद पथ..
पश्चिमेला तेग बहाद्दूर नगर ..
आणि पूर्वेला मेथडिस्ट चर्च
कबुतरांचा हल्लकल्लोळ ... भिकार्‍यांची रास
नाका-कामगारांचे भ्रांतयुक्त चेहरे ..
ताकदीनं घोंगावणारा नेलपेंट रिमुव्हरचा वास
प्रातःविधीला उघड्यावर बसलेली मुलं..
अर्धनग्न काया, कडेवर निर्वस्त्र चिमुरड्या
चेहर्‍यावर स्त्रीत्व मेल्याच्या स्पष्ट खुणा अधोरेखित
वखवखणार्‍या तंबाखूच्या ओठांतून पडणारा
दे ग माय, दे रं बाबा चा पाढा ..
नवटाग पेगची सोबत घरणारा
मागून चालत चालत मिठाचा खडा चाखणार्‍यांचा घोळका ..
सकाळी सकाळी स्वच्छ सुर्यप्रकाशातही
गढूळ समाजव्यवस्थेचे दर्शन घडवणारा
न पाहिलेला ..  किंवा न दाखवला गेलेला
कायम उपेक्षिला गेलेला भारताचा एक समाज...
--वैभव छाया --

 
Design by Free WordPress Themes | Bloggerized by Lasantha - Premium Blogger Themes | JCPenney Coupons