गांधी चौकातला टिळकांचा पुतळा ..
उत्तरेला नवरोजी मार्ग ..
दक्षिणेला सय्यद पथ..
पश्चिमेला तेग बहाद्दूर नगर ..
आणि पूर्वेला मेथडिस्ट चर्च
कबुतरांचा हल्लकल्लोळ ... भिकार्यांची रास
नाका-कामगारांचे भ्रांतयुक्त चेहरे ..
ताकदीनं घोंगावणारा नेलपेंट रिमुव्हरचा वास
प्रातःविधीला उघड्यावर बसलेली मुलं..
अर्धनग्न काया, कडेवर निर्वस्त्र चिमुरड्या
चेहर्यावर स्त्रीत्व मेल्याच्या स्पष्ट खुणा अधोरेखित
वखवखणार्या तंबाखूच्या ओठांतून पडणारा
दे ग माय, दे रं बाबा चा पाढा ..
नवटाग पेगची सोबत घरणारा
मागून चालत चालत मिठाचा खडा चाखणार्यांचा घोळका ..
सकाळी सकाळी स्वच्छ सुर्यप्रकाशातही
गढूळ समाजव्यवस्थेचे दर्शन घडवणारा
न पाहिलेला .. किंवा न दाखवला गेलेला
कायम उपेक्षिला गेलेला भारताचा एक समाज...
--वैभव छाया --

No comments:
Post a Comment