Wednesday, December 21, 2011

Say No to Janlokpal Bill


Say No to Janlokpal Bill

     
While we can all celebrate the huge outpouring of the otherwise indifferent youth of India onto the streets triggered by Anna Hazare Movement, and become happy that this movement has singlehandedly woken up the apathetic Government of India to take up the battle against corruption quite seriously, let’s not go overboard and accept Janlokpal Bill.  The draft bill from these activists, the self-appointed guardians of Indian society, whose elitist speeches and attitudes find their way into the provisions of the bill, is as dangerous to India as the corruption itself, if not more.  In trying to fight one disease, let’s not install it with another.  If we adopt the bill imposed by these activists, we may be introducing a deadly cancer while attempting to fight the common cold. 
Jawaharlal Nehru, the first Prime Minister of India, became de facto leader of the nation after the death of Patel, and his ideas have permeated down into almost all institutions of India.  While we can be happy that Nehru did not become dictatorial, when he could have easily become one, his attitude that the central government is the biggest benefactor of the common man has created many a malaise in this country.  Freedom from British came tagged with a price of the bloody Partition of the subcontinent where nearly half a million people were murdered in the riots.  Patel, the Iron Man of India, aided by V P Menon, secured allegiance of nearly 550 princely kingdoms, mostly through negotiations and sometimes through force.  Though the country was eventually forged into one Union, it looked fragile, about to break into small pieces anytime.  Added to this problem was the vociferous demand from various regions seeking statehood on the basis of the language, which posed a threat of balkanization of the newly formed country.  Meanwhile the Tamils fought aggressively against the imposition of Hindi as the national language and warned of secession from India forever removing the hope that this country could be united on one language. 
Battling these seemingly disintegrating struggles within and getting impressed by the Russian experiment of a strong state administration, Nehru started to put faith in the benevolence of a strong central government, partly because he was heading it, and mostly because he mistrusted the state governments and private institutions who he thought were more keen on securing their selfish interests rather than work towards unity of the country.   Nehru saw the central government as the caring mother, a protector and champion of freedoms and opportunities of the common man, while the states looked like quibbling kids.  This led to monopolizing most of the power in few central institutions which did not get checked and balanced the way they should have been.  Indira Gandhi rode on top of this established path and went further down to create an autocratic central government dismissing state governments at will.  She believed she was right while everyone was wrong.  She believed she imposed all those coercive methods in the greater interests of the nation and its people.  She did not suspect herself and her own institutions while she put everyone else behind bars.  These are the lessons we should not ignore in the current anti-corruption movement.

Janlokpal Bill mistrusts almost every organ of the Government of India and treats almost every elected leader and government official as a suspect while it exempts itself of any wrongdoing.  With this attitude, it arrogates itself many rights and powers which tend to undermine Indian democracy.  In an attempt to provide teeth to the new ombudsman, it ends up creating a Tyrannosaurus Rex, equipping it with fast legs, razor sharp teeth, fierce claws and a big appetite.

All-in-one body with no master

In their eagerness to solve all the problems of this nation in one stroke, the activists have come up with a childish dream with an elitist agenda.  Right out of the children’s comic books, they create a super sleuth, super cop, super judge with a license to take away your basic rights with zero accountability, all rolled into one.  That super character is called Lokpal - as promoted by Janlokpal Bill(s).

Lokpal will be the investigation agency:
“…anti-corruption branch of CBI… shall form part of the Investigation Wing of Lokpal.

Lokpal will be the police force:
“…Officers of Lokpal… shall have all the powers which are vested in a Police Officer…”
The investigative arm of “Delhi Special Police Establishment… shall stand transferred, along with its employees, assets and liabilities to Lokpal… The Central Government shall cease to have any control over the transferred part and its personnel…”

Lokpal can tap your phone or read your e-mail without taking any permission:
“…empowered to approve interception and monitoring of messages of data or voice transmitted through telephones, internet or any other medium…”

Lokpal can invade your home based on suspicion and break open your door or any safe:
“(i) enter and search any building or place where he has reason to suspect…”
“(ii) search any person who is reasonably suspected of concealing…”
“(iii) break open the lock of any door, box, locker safe, almirah or other receptacle… where the keys thereof are not available.”
“Seize any such property, document, money, bullion, jewellery…”

Lokpal will be the court:
The members of Lokpal or any officer under the Lokpal… shall have the powers of a civil court trying a suit under the Code of Civil Procedure, 1908…”
 “…punish a public servant with imprisonment up to 6 months…”

Lokpal will be free from any accountability or prosecution:
“No suit, prosecution, or other legal proceedings shall lie against the Chairperson or members or against any officer, employee, agency or person” of Lokpal. 
“… no proceedings or decision of the Lokpal shall be liable to be challenged, reviewed, quashed or called in question in any court of ordinary Civil Jurisdiction.’

While the Lokpal will hold no accountability to any office or agency in this country, and will remain unanswerable and un-prosecutable by any court in India, it will have all the rights to investigate and tap the communications of anyone, break open your door to enter your home, break open your safe, arrest you without taking permission from any other body, and prosecute you in their kangaroo courts to imprison you.  The newly created Lokpal will be an investigating agency, plus it will be a police station, plus it will be a court, plus it will not be answerable to anyone. 

We should strongly suspect any move which tries to centralize all the institutions into one giving it so many absolute powers.  A democracy runs effectively only when we create independent institutions that keep a check on each other.  That’s why we have executive, legislature and judiciary as three separate arms.  At no time shall we encourage all the three coming together under person – that’s when we create dictatorships.   The current institutions of CAG, CVC, and CBI have a role to play and if ever we need to fight corruption, we should strive to make these bodies more independent, giving them more power and autonomy.  Let’s realize this - Raja, Kanimozhi and Kalmadi are all in jail in spite of a Lokpal. 

In an attempt to overcome the weakness in the current institutions, Janlokpal Bill wants to replace them all with a new body that is assumed to be perfect and free from any corruption.  Such thinking is fundamentally flawed.  No single institution can be trusted completely with so much power.  That’s why we have separate democratic institutions with distributed powers working independently checking each other.  Moving all these institutions under one body is the most foolhardy thing we can do at this point of time. 

There is a reason why the police force and judiciary is not under one body.   If a police officer arrests you on false evidence, you can challenge it in the court.  Imagine this - the police officer who arrested you turns out to be the judge deciding your case. Janlokpal believes that it will be able to dole out justice efficiently this way.  If efficiency is the primary objective, then dictatorships happen to be the most effective.

If you think that was the end of this comic book, the fairy tale does not end there.

Lokpal can transfer a government servant based on a suspicion of wrongdoing:
 “…issue appropriate directions including transfer of that government servant from that position.”

Lokpal can stop the decision of a government from implementation based on a suspicion:
“…may make any recommendation to the public authority concerned to stay the implementation or enforcement of any decision...”

And if the government authority rejects the recommendation of Lokpal, it can prosecute the officials:
“…approach the appropriate High Court for seeking appropriate directions to be given to the public authority.”

Imagine this - you can be prosecuted if even you fail to comply with a recommendation that might come out of mere suspicion. 

:-) 

I couldn’t help but put a smiley there because the bill only gets interesting and funnier, something that I could read out to my kids as a comic story.  The tragedy is that it is not a funny story, but is being pushed by millions of young and innocent Indians to be passed in the Indian Parliament to be made into a law.

Lokpal can confiscate private property just because the owner lied about it:
“If it is found that the public servant owns some property which was not disclosed in his statement of assets, that property would be liable to be confiscated by the Lokpal.”

Lokpal does not allow bail to a suspect:
“Section 389(3) of CrPC shall not apply to offences under Prevention of Corruption Act.

Lokpal can confiscate private property just because the owner has failed to disclose it.  Lokpal denies bail to a suspect.  Even some dictatorships are more respectful of individual rights than this bill.  Or is it that these activists don't think that politicians and government officials are individuals with rights?

Anyone in the right frame of mind would reject the Janlokpal Bill.  It may be wiser to tolerate corruption in this country than have this Janlokpal.  Using an innocent man who reminds us of Mahatma Gandhi as the mascot, these activists are pushing an autocratic bill into Indian democracy which portends to demolish all its cherished institutions. 

It is clear that these activists do not have respect for the legal procedures; they do not believe that a suspect has certain rights; and they do not have the patience to go through the rigor of a judicial system.   They want to bypass all the prescribed procedures to convict a corrupt official immediately, without giving the suspect the due legal recourse - looks like they are out to take some kind of revenge by punishing all the office holders in country.  They want to create a utopia where ‘perfect justice’ is doled out in five minutes like in a fast-food restaurant.

We must realize that all such endeavors to create perfect systems have failed in the history of mankind.  Communists thought they had a utopia written in a hand book, and so did Nazis. After many failed experiments, we realize now that there is no such a thing called perfect institution, perfect form of government or perfect solution to any complex social or political problem.  The bill proposed by these activists is beset by the same underlying attitude which created this gargantuan and heavily bureaucratic government in the first place- that there is a set of people or institutions who can be entrusted with absolute power, because they happen to be benevolent, most kind, perfectly honest and free from any kind of corruption, for all times of time.

We understand now that the only form of institution that works is the one which requires constant work- something which has checks and balances, something that does not have absolute powers, something that allows change, something that mistrusts itself.  A modern nation based on a constitutional and parliamentary democracy does not believe in creating a perfect society; it only strives to reduce the imperfections of the human societies, never attempting to completely eliminate them, because that is impossible.  Any attempt to root out corruption completely and permanently will be beset with the same problems it tries to combat.  We can only strive to reduce corruption so that a common man does not get affected by it, so that this nation chugs forward to create equal opportunity and prosperity to all its citizens unhindered by bad policies or complex bureaucracy.

We should not be eager or earnest to create a body that is not answerable to anyone and yet has absolute powers to break open anyone’s door, investigate anyone, prosecute anyone and then convict anyone. We will then create a Frankenstein monster that will eat up this democracy in one gobble.  Unbridled power corrupts, eventually.  Janlokpal bill comes with that power.  We should exercise caution, not get carried away by our patriotism, nationalism or jingoism.  Let’s make sure we create a Lokpal that incorporates the necessary checks and balances.  

As a step one, let’s debate.

Source:--


Tuesday, December 20, 2011

रखरखणारी सावली ..

चमेली गजरा आणि कवळ्या कलेजीची शिकार ...

हातांना गुंडाळलेला गजरा ..

श्वास कोंडणारा स्वस्त अत्तराचा दर्प ..

बेवारशी फिरणारी नायजेरीअन वंशाची भारतीय आयांची मुलं

डावं - उजवं जाणणार्‍या नेपाळी आणि बांग्लादेशी पोरी ...

खुमासदारीने मजा घेणारे .. काम करत असल्याचा आव आणत ..

मनात अनुदानाच्या हिस्स्याचा लाडू फोडत फिरणारे एनजीओवाले...


मध्येच घोगर्‍या आवाजात खिमा पावाची ऑर्डर देणारी अम्मा..


रोगीला देखील भोगणारे लिंगपिपासू


नागव्या चाकूला एकदा तरी ओला करणारे मकोडा


कंडोमच्या फुग्याला दिलेली श्रद्धांजली..


अशीच काहीशी भासत होती नामदेवाने वर्णिलेल्या त्या कामाठीपुर्‍यातली ती रखरखणारी सावली ..



-- वैभव छाया --


नामदेवाला अर्पण


Saturday, December 10, 2011

नवा सूर्य कवेत घेताना


' शिका, संघटित व्हा, संघर्ष करा' हा मंत्र देत दलित समाजाला आत्मसन्मानाची दिशा दाखवलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मंगळवारी, ६ डिसेंबरला महापरिनिर्वाणदिन. त्यानिमित्त आजच्या पिढीतील दलित तरुणाईच्या आशा, आकांक्षा, स्वप्नं आणि स्पंदनं टिपणारा हा लेख.
...............

   येत्या ६ तारखेला बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनी भारतभरातून लाखोंचा जनसमुदाय चैत्यभूमीवर आपल्या लाडक्या उद्धारकर्त्याला अभिवादन करण्यासाठी एकत्र येतील. ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचा तेजस्वी सूर्यच अस्ताला गेला होता. इतिहासाच्या एका गौरवशाली अंकाचा शेवट आणि बापाविना पोरक्या झालेल्या समाजाचा कधीही न थांबणारा संघर्ष सुरू झाला. आज त्यांना अर्धशतकाहून अधिक काळ लोटला असला तरी बाबासाहेब नावाच्या वादळाचा झंझावात तसूभरही कमी झालेला नाही. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा चा मूलमंत्र मिळालेला आंबेडकरी समाजातील तरुण अजूनही अपेक्षित विकास साधू शकलेला नाही. एकूणच या तरुणांच्या सांप्रत स्थितीतील जगण्याच्या पातळीवरील समस्या आणि समकालिन प्रश्नांचा मागोवा प्रातिनिधिक स्वरुपात घेणे यानिमित्ताने उचित ठरेल. 
राजकीयदृष्ट्या सर्वाधिक सजग असणारा तरुण वर्ग बाबासाहेबांच्या हयातीनंतर रिपब्लिकन पक्षाच्या फाटाफुटीच्या राजाकारणाला, राजरोसपणे होणार्‍या अत्याचारांना कंटाळला होता. ७० च्या दशकात याच तरुणांनी कोणत्याही प्रकारची सेटलमेंट नाकारत समाजाला दलित पँथर चा पर्याय दिला. आपसूकच रिपब्लिकन चळवळ ते दलित चळवळ असे ट्रान्सफॉर्मेशन घडून आले. पहिल्यांदाच प्रस्थापित व्यवस्थेला नाकारण्याची धमक दलित पँथर ने तरुणांना मिळवून दिली. पण येरे माझ्या मागल्या करत दलित पँथर देखील फाटाफुटीच्या राजकारणाला बळी पडली. परत रिपब्लिकन पक्षाचा आश्रय घेत आजमितीला ४४ गटांमध्ये पक्ष विभाजित झाला आहे. बाबासाहेबांनतर बहुजन वर्गाला सर्वंकष नेतृत्व आजतागायत मिळालेले नाही. राजकारणाबद्दल मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेल्या अनास्थेला रिपब्लिकन नेतेच जबाबदार आहेत. ह्या नेत्यांनी समाजाला कधीच अर्थकारण मिळवून दिले नाही. पीपल्स एज्युकेशन सोसायटीसारख्या दमदार शिक्षणसंस्था उभारल्या नाहीत. उत्कृष्ट लेखकांना कधीही प्रोत्साहन दिले नाही. प्रशासकीय, सनदी सेवेतील अधिकारी घडवणार्‍या किती संस्था स्थापन केल्या हा देखील गहन प्रश्न आहे. खेड्यापाड्यात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणारे किती इस्पितळे उभारण्यासाठी पुढाकार घेतला किंवा त्यासाठी किती आंदोलने केली? सामाजिक अस्मितेच्या नावाखाली दिली ती फक्त आंदोलने, पण पोटासाठी भाकरी मिळवून देण्यात मात्र सारेच अयशस्वी ठरले. रिपब्लिकन नेते खुद्द हे वास्तव नाकारणार नाहीत. नवे उद्योगधंदे व नव्या दमाच्या उद्योजकांना वाव देण्याचे औदार्य दाखविलेले नाही. कार्यकर्ते केवळ बॅनरबाजीसाठी, आत्मदहन करण्यासाठी, सभेला गर्दी जमवण्यासाठी पण त्यांच्या विकासासाठी कोणतीही ठोस उपाययोजना नाही. बाबासाहेबांनी एकदा म्हटले होते. “Political power is such a master key by which you can open each and every lock.”  सत्तेचा हव्यास हा फक्त स्वतःचा पोकळ आत्मभिमान शमवण्यासाठीच केला जात आहे.
आरक्षणाचा प्रश्न, खाजगी विद्यापीठांचा प्रश्न, खाजगीकरणाची लाट, रमाबाई नगर हत्याकांड, खैरलांजी हत्याकांडातील पीडीतांना, वंचितांना न्याय मिळाताना दिसत नाही. त्यासाठी कोणी खास प्रयत्न करत असल्याचेही दिसत नाही. राजरोसपणे अॅट्रोसिटीची प्रकरणे घडतच आहेत. क्रिडा क्षेत्रात प्रतिनिधित्व नाही. माध्यमजगातातलं दुय्यम स्थान, दिवसेदिवस महाग होत जाणारी शिक्षणव्यवस्था, छुप्या पद्धतीने समाजव्यवस्थेत उपलब्ध असलेली जातीयता, समाजव्यवस्थेकडून, न्यायव्यवस्थेकडून होणारी उपेक्षा  आंबेडकरी तरूणाला सर्वांगीण विकासापासून दूर लोटत आहे. नामांतराचा विषय वेळपरत्वे पेटवणार्‍या राजकीय पक्ष मागासवर्गीयांसाठी घोषित झालेल्या योजनांमधील भ्रष्टाचारावर रान उठवित नाही. ठराविक अपवाद वगळता काही स्वार्थलोलूप राजकारण्यांनी स्वाभिमानी आंबेडकरी तरुणाला निवडणूकीच्या काळात हमखास उपलब्ध असलेली कार्यकर्त्यांची एकनिष्ठ फौज, त्यांची एकगठ्ठा मते, विश्वासू व्होट बँक असा बहाल केलेला अपमानास्पद दर्जा त्याला निराश बनवत आहेत. परिस्थिती निराशाजनक असली तरी पूर्णतः कुचकामी बनलेली नाही. शेवटी अंधारातूनच आशेचा किरण उगवत असतो.
स्वातंत्र्यापेक्षा काहीच उच्च नाही, गुलामीपेक्षा काही नीचतम नाही. स्वातंत्र्याचा आस्वाद घेणे ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे. बाबासाहेबांच्या चळवळीने विचारस्वातंत्र्य बहुजन समाजाला दिले. विचारशक्तीच्या जोरावर सुशिक्षित तरुणाने दलित ही ओळखवजा कलंक पुसून टाकताना स्वतःची  ओळख आंबेडकरी तरूण म्हणून प्रस्थापित करण्याचा चंग बांधला आहे. जातीधर्माआधी भारत अग्रस्थानी ठेवून संविधान राष्ट्राचा, पर्यायाने प्रत्येक नागरिकाचा आद्यग्रंथ मानणारा, अंगिकार करणारा, सदैव संविधान संरक्षणार्थ तयार असणारे हे युवा बुद्धांचा अतःदिप भव हा संदेश अंगिकारून स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जागतिकरणाच्या समस्यांनी ग्रासलेले असताना सध्याचा लढा हा केवळ जातीअंतापुरता मर्यादित न ठेवता त्याच्या कक्षा खाजगीक्षेत्र विरुद्ध सार्वजनिक क्षेत्र अशा रुंदावण्याची तयारी देखील करून ठेवलेली आहे. बहुजन तरुणांनी खासगी क्षेत्रात उद्योगशीलता जपल्याशिवाय भारताचा उद्धार होणार नाही. स्वतः उद्योजक झाल्याशिवाय देशातील तरूणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आपण कायम असमर्थ ठरणार आहोत हे या पीढीने अचूक हेरले आहे. त्यातूनच मिलिंद कांबळेंसारखे धडाडीचे उद्योजक पुढे आले. त्यांच्या प्रयत्नांतून जन्माला आली दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज(डिक्की). 'Be job givers instead of job seekers' हे डिक्कीचे ब्रीदवाक्य. स्वयं प्रतिभेने जागतिकीकरणाच्या संधींचा फायदा घेउन हा तरुण वर्ग आपले कर्तृत्व सिद्ध करू पाहत आहे.  
       आज भारतातील सारा बहुजन समाज माध्यमविरहीत आयुष्य जगतोय असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. स्वतःचे माध्यम नाही म्हणून व्यक्त होता येत नव्हते. परंतू सोशन नेटवर्किंग साईट्स चा आधार घेत आपले स्वतःचे माध्यमविश्व उभारुन माध्यमजगतातलं नवं आणि प्रभावी इवॉल्यूशन घडवणारे हेच तरुण होय. स्वातंत्र्यापूर्वी शिक्षण एक आव्हान होते पण युवावर्गाने जबाबदारीने शिक्षण ही आजची मूलभूत गरज असल्याचे समाजमनावर स्पष्टपणे प्रतिबिंबित केले आहे. पण शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी लागणारा प्रयत्न करताना मात्र ही पीढी उदासीनता बाळगते आहे. इंग्रजी आंतरारष्ट्रिय व्यवहारातील भाषा, ती आत्मसात करणे व जे जाणीत नाहीत त्यांना शिकण्यासाठी प्रवृत्त करणे, त्यासाठी आवश्यक स्त्रोत उपलब्ध करुन देणे तितीकेच महत्त्वाचे आहे. शिकून पदव्या मिळविल्या, स्वतःचा उत्कर्ष झाला म्हणजे सारा समाज सुधारला असेही होत नाही. खाजगीकरणाचा वाढता रेटा हा जातीयतेच्या व शोषकांच्या व्यवस्थेला घट्ट करणारा आहे. त्यासंदर्भात मेनस्ट्रिम मधले आपण मुठभर तरुण पुन्हा आपल्या मुळांकडे जाण्यास तयार आहेत का ? तेथील लोकांना विकासाच्या संधी उपलब्ध करून देणार आहोत का? वर्तमान स्थितीतील आव्हाने झेलण्यासाठी आपण त्यांची मनगटे मजबूत करणार आहोत का ?
स्वातंत्र्योत्तर काळात सत्तेच्या चक्रव्यूहात आपल्या दोन पिढ्या बरबाद झाल्या. आंबेडकरी वर्गाकडे स्वतःचे असे राजकीय तत्त्वज्ञान आहे. राजकीय समज आहे. मग अजूनही राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रांत पीछेहाट का ? सत्ता-आसक्ती ला झुगारून नैतिक जीवन मुल्ये रुजवून तत्वज्ञानाचा पाया मजबूत करण्याची गरज आहे. जेणेकरून कुठल्याही संकटाला सामोरे जाण्याचे धाडस त्यांच्यात निर्माण होईल. याच आंबेडकरी समाजाने भारत देशाला डॉ. मुणगेकर, डॉ. नरेंद्र जाधवांसारखे अर्थतज्ञ दिलेत. कल्पना सरोज सारख्या यशस्वी उद्योजक दिलेत. नामदेव ढसांळ, लक्ष्मण मानेंसारखे क्रांतिकारी कवी-लेखक दिले आहेत. अनेक नावाजलेले सनदी अधिकारी, विद्वान हे आंबेडकरी चळवळीने या देशाला दिलेली देणगीच आहे. हा वारसा पुढे चालवत आंबेडकरी तरुणाने स्वविकास साधल्यानंतर समाजाप्रती असलेले उत्तरदायीत्व पूर्ण करायलाच हवे. समाजबांधवांच्या समस्यांप्रती संवेदनशील राहणे गरजेचे आहे. आंबेडकरी चळवळ ही केवळ महारांची, बौद्धांची चळवळ म्हणून सीमीत न ठेवता तीचे रुंदीकरण सार्‍या मागासवर्गाच्या समावेशात केले जावे. कोणताही राजकीय पक्ष हा कणखर, खंबीर नेतृत्वाच्या बळावर यश संपादन करत असतो. हे नवे नेतृत्व घडवण्यासाठी आत्ता युवावर्गालाच पुढाकार घ्यावा लागेल.  किती दिवस इतर जातीय बांधवांच्या नावांने आपण बोटे मोडायची, राजकीय नेतृत्वाला, प्रस्थापित व्यवस्थेला दूषणे देणार? स्वर्ग पहायचा असेल तर बलिदान तर द्यावेच लागेल. नवनिर्माणासाठी स्वतः पुढाकार घ्यावा लागेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना चौफेर अभ्यासण्याची गरज आहे. आजवर केवळ कायदेतज्ञ म्हणून माहित असलेले बाबासाहेब हे उच्च दर्जाचे अर्थतज्ञ होते, त्यांची संरक्षण विषयक तत्वज्ञानाची महती आज जगाला कळून चुकलीये, अशा  बहुआयामी बाबासाहेबांचा आधुनिक आदर्श निर्माण करण्याची नितांत आवश्यकता आहे. चळवळीचे तत्त्वज्ञान व कार्यपद्धती ही एकप्रवाही न ठेवता चळवळीची मेथेडोलॉजी सर्वंकष स्विकाराहार्य व बहूप्रवाही करण्यावर भर द्यावा लागेल. बु्द्धप्रणीत समाजक्रांतीचा अवलंब करावा लागेल. तो करण्यास आपण तय्यार आहोत का ?    
       आज आंबेडकरी  समाजातील राजकीय, सामाजिक नेतृत्व रसातळाला गेले असल्याची कठोर भावना या तरुण पीढीत घर करून आहे. खरे तर हा चळवळीचा नव्हे, चळवळ चालवणार्‍यांचा पराजय आहे. ही परिस्थिती बदलणे सर्वस्वी तरुणांच्या हातात आहे. जोवर तरुण स्वतः ग्राउंड रिएलिटीला स्विकारत नाही तोवर सर्व स्तरांत नेतृत्वबदल घडून येणे अशक्य आहे. रसातळाला गेल्यावर फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेण्याची जिद्द ही आपल्यात आहे हे अंगी बाणवावे लागेल. लढ्यासाठी सज्ज व्हावे लागेल. बाबासाहेबांनी घडवलेल्या सोनेरी युगाचा, जाज्वल्य अभिमानाचा, आत्मभिमान जागृत करणार्‍या संघर्षाचा, यशापयशाचा, समस्यांचा अभ्यास करावा लागेल                                   .                      
मानवमुक्तीच्या लढ्यासाठी न्याय हक्कांसाठी लढा पुकारावा लागेल. मानवमुक्तीच्या सर्वंकष लढ्यातूनच आधुनिक लढ्याच्या नव्या दिशा जन्म घेतील..
वैभव छाया


सदर लेख हा मटा मध्ये प्रसिद्ध झाला होता. 
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10975367.cms

Friday, December 2, 2011

कोण करत आहे शिवाजी महाराजांचे अपहरण?


  
गेल्या रविवारी २० नोव्हेंबर २०११ रोजी माझा लोकमतमद्धे "शिवाजी महाराजांना देव बनवणारा हा गोतिये कोण?" हा लेख प्रसिद्ध झाला होता. त्याला पार्श्वभुमी होती ती एका प्रसिद्ध दैनिकातील ४ नोव्हेंबर रोजीची मुखप्रुष्ठावर प्रसिद्ध झालेली बातमी. शिर्षक होते "फ्रेंच अभासक उभारतोय शिवस्रुष्टी" आणि याच बातमीत दुस-या परिच्छेदात म्हटले होते कि "लोहगांव येथे पाच एकरात शिवाजी महाराजांचे मंदिर आणि त्यांच्या पराक्रमाचे माहिती देणारे संग्रहालय उभारण्यास गोतिये यांनी सुरुवात केली असुन त्याचा पहिला टप्पा या महिन्यात पुर्ण होत आहे...." याच बातमीत पुढे म्हटले आहे कि या संग्रहालयात वेदांचे महत्व सांगणारी विविध शिल्पे, चित्रे व दुर्मीळ साहित्य या माध्यमातुन संपुर्ण भारतीय संस्क्रुती दाखवली जाणार आहे." खरे तर माझा लेख लोकमतने आवर्जुन प्रसिद्ध केला. त्यामुळे महाराष्ट्रात एक वैचारिक वादळ उठले. पण गोतिये यांचे या लेखाला उत्तर छापुन आले ते डीएनए या इंग्रजी दैनिकात दिनांक २३ नोव्हेंबर २०११ रोजी. या उत्तरात पहिली चुक म्हणजे माझा लेख १९ नोव्हेंबर रोजी छापुन आला आहे असे केलेले प्रारंभीचे विधान. प्रत्यक्षात ते २० नोव्हेंबर रोजीचे असायला हवे होते. पण मी या इतिहाससंशोधक फ्रेंच-हिंदुला ती गफलत माफ करतो. या लेखाचे शिर्षक होते, "Hijacking of Shivaji Maharaj by vested interests." (छुपा हेतु असणा-यांचे शिवाजी महाराजांचे अपहरण...) मुख्यारोप अर्थात माझ्याकडेच होता...पण मला म्हणायचेय कि कोण शिवाजीमहाराजांना वैदिक तंबुत हायज्यक करू पहातोय? हे गोतिये आणि त्यांचे छुपे समर्थक, मी नव्हे कारण मी मानवी स्वरुपाच्या एका महानायकाकडे, शिवाजी महाराजांकडे, एक माणुस म्हणुन पहातो, दैवी अवतार म्हणुन नव्हे कि दैवी आशिर्वादाने महनीय क्रुत्ये पार पाडनारा माणुस म्हणुन नव्हे. शिवाजी महाराजांना भावानी मातेने तलवार दिली हे काव्यात्मक उल्लेख इतिहास ठरवणारा हा इतिहास संशोधक कसा असु शकतो?

 मुळात पुण्यतील वर्तमानपत्रातील बातमीत आणि या डीएनए मधील लेखात गोतिये यांनी आव असा आणला आहे कि जणु ते आजही फ्रेंच आहेत, जे खरे नाही. शिवाजी महाराज व भारतीय संस्क्रुती याचा आपला गाढा अभ्यास आहे हे ते म्हणतात तेही खरे नाही, ते कसे हे आपण त्यांच्याच डीएनए दैनिकातील त्यांच्याच स्पष्टीकरणातुन स्पष्ट करुन घेवू.

 त्यांच्या प्रत्युत्करात्मक लेखात ते म्हणतात कि शिवाजी महाराजांना राष्ट्रीय नायक म्हणुन पुढे आणायला हवे. म्हणजे आधीच शिवाजी महाराज हे भारतीय जनतेचे महानायक नव्हते आणि आता स्व-क्रुत शिवाजी-मंदिरामुळे ते महानायक ठरतील असे त्यांचे म्हणने आहे. ही त्यांची सरळ सरळ लबाडी आहे.

 त्यांनी लेखात अजुन केलेली लबाडी अशी आहे कि, ते म्हणतात, "हा देश भवानी भारती, भारत वा इंडिया या नांवाने ओळखला जात असला तरी शिवाजी महाराज निधर्मी होते...." आणि पुढे हेच सद्ग्रुहस्थ म्हणतात "मला खात्री आहे कि शिवाजी महाराज हे हिंदु होते जसे आजचे मराठा वा तमिळ असतील..." आता मला या सद्ग्रुहस्ताला प्रश्न विचारायचाय कि जर महाराज निधर्मी होते, जे सत्यच आहे, तर मग ते गोतिये म्हणतात याप्रमाणे कट्टर हिंदु कसे असु शकतील? किंबहुना सर्वांना महाराजांबद्दल जो आदर आहे तो ते खरेखुरे निधर्मी असल्याने.

 मला येथे दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत. भवानीमातेला आम्ही जगद्जननी म्हणुन पुरातन काळापासुन ओळखतो. भव म्हणजे विश्व, ते निर्माण करणारी ती भवानी. भारती ही मात्र ऋग्वेदातील एक दुय्यम देवता आहे. अदितीएवढेही स्थान तिला ऋग्वेदात नाही. दुसरे असे कि ऋग्वेदाला मुर्तीपुजा मान्यच नसल्याने एकाही ऋग्वैदिक देवतेचे मंदिर भारतात आजही नाही. मग भवानी आणि भारतीची सांगड घालण्याचा गोतिये यांचा प्रयत्न नेमका कशासाठी आहे? त्यांच्या प्रेरणा नेमक्या कोणत्या आहेत? शिवाजी महाराज निधर्मी होते असे सांगतांनाच ते "हिंदु" होते हे सांगण्यामागील कारंण काय आहे?

 भारत माता आणि भारती माता यातील फरक या तथाकथित विद्वानाला समजलेला दिसत नाही, किंबहुना ते या बाबतीत वेड्याचे सोंग घेत पेडगांवला जात आहेत असे नाइलाजाने म्हणावे लागते.

 पुढे हे विद्वान ग्रुहस्थ श्री अरबिन्दो घोष यांचा दाखला देत म्हनतात कि "आम्ही शिवाजी महाराजांना देव मानत नसुन "विभुती" मानतो." यांना भारतात २०-२५ वर्ष राहुनही भारतीय संस्क्रुती शुन्य समजली आहे असाच याचा अर्थ. विभुती म्हणजे दैवी शक्तीचे अंशता: वा पुर्णावतरण...अवतार. विभुती या चमत्कारांशी संबंधीत असतात. त्यांच्या सर्वच क्रुती या चमत्कारांत जातात,,,,त्यांना कसलाही मानवी प्रयत्नांचा, अलांघ्य मार्ग आक्रमिण्यामागील प्रेरक मानवी स्त्रोतांचा संबंध नसतो. त्या फक्त दैवी इच्छेने घडणा-या घटना असतात.

 म्हणजे मग या सद्ग्रुहुस्थांना माझा आक्षेप समजलेलाच नाही. यांनीच आई भवानी...( आता ते तिला एकाएकी भवानी भारती म्हणायला लागले आहेत...) शिवाजी महाराजांना तलवार देते असे शिल्प आधीच सिद्ध करुन ठेवले आहे. पुण्यातील एका प्रमुख व्रुत्तपत्राने यांच्याच मुलाखतीनुसार हे शिवाजी महाराजांचे मंदिर व शिवाजी महाराज आणि वेदांचे संग्रहालय आहे असे प्रसिद्ध केले आहेच. त्याबाबत या उत्तरात गोतिये महोदय एक शब्दही लिहित नाहीत. त्याचे एकही स्पष्टीकरण देत नाहीत. उलट कांगावा करतात कि हिंदुंचे खरे शत्रु हे हिंदुच आहेत. त्यासाठी ते मिर्झाराजे जयसिंहांचे उदाहरण देतात. पण मला दाट शंका आहे कि २०-२५ वर्ष भारतात राहुन आणि हिंदुत्वाचे धडे गिरवुनही या ग्रुहस्थांना भारतीय इतिहास माहितच नाही. कारण यांना हे माहित नाही कि औरंगझेब ते आदिलशहाच्या दर्बारात जसे हिंदु सरदार होते तसेच शिवाजी महाराजांच्याही सोबत बहाद्दर आणि जीवाला जीव देणारे मुस्लीम सरदार आणि सेवक होते. हा लढा, गोतिये समजतात तसा, हिंदु आणि मुस्लिमांतील नव्हता तर, अन्याय करणारे आणि अन्यायाविरुद्ध लढणारे यांच्यातील होता. यांना पुन्हा एकदा हिंदुत्ववादी चश्म्यातुन बाहेर पडुन इतिहासाचे पुनरावलोकन करण्याची गरज आहे. हिंदुंचे शत्रु हिंदु असतील असे एक वेळ मान्य करु, मग मुस्लिमांचे शत्रुही भारतात मुस्लिम नव्हते कि काय? हे गोतियेंना बहुदा कोणी शिकवलेले नसावे. किंवा त्या माहितीची दखल त्यांना घ्यावी असे वाटले नसेल.
 मला स्पष्टपणे वाटते ते हे कि श्रीयुत गोतिये यांना भारतीय संस्क्रुती वा शिवाजी महाराजांचा कसलाही इतिहास माहित नाही. त्यांचे बोलवते धनी वेगळेच आहेत. फाउंडेशन अगेन्स्ट कन्टिन्युंग टेररीझम (FACT) ही त्यांची संघटना, जी हे मंदिर आणि संग्रहालय बनवत आहे ती इस्लामविरोधी संस्था आहे हे कोणीही वेबवर सम्शोधन करुन समजावुन घेवु शकतो. विजत्यनगरमद्धे यांच्याच FACT या संस्थेने उभारलेले संग्रहालय का उद्ध्वस्त केले गेले हे ते सांगत नाहीत, उलट लिंगायत समाजाला आरोपीच्या पिंज-यात उभे करतात.


 पण सर्वात महत्वाचे म्हणजे शिवाजी महाराजांचा या घडत असलेल्या मंदिररुपाने कोणीही आजवर एवढा घोर अवमान केला नसेल. मानवी कर्तुत्व आणि त्यांच्या स्थितीसापेक्ष परिसीमांना दैवी आधार देणे म्हणजे महाराजांचे खरे अपहरण होय...शिवाजी महाराजांचे अपहरण मी नव्हे तर गोतिये व त्यांचे कडवे समर्थक करत आहेत. मी त्यांचा येथे पुन्हा एकदा स्पष्ट निषेध करतो.

 श्रीमान गोतिये, भवानी भारती म्हणोत कि भारत माता, शिवाजीराजांना तलवार देत आहे हे मध्यवर्ती शिल्प जेंव्हा पुढाकार घेत उभारतात तेंव्हा त्यांना त्या क्रुत्याचा मतितार्थ समजला पाहिजे. मानवी प्रेरणा आणि दु:सह संकटे झेलण्याची भारतीय मानसिकता यांचेच ते अपहरण करण्याचा डाव रचत आहेत हे स्पष्ट दिसते. मानवी महानायकांचे हे दैवतीकरण आजचा समाज सहन करु शकत नाही हे त्यांना व त्यांच्या छुप्या पाठिराख्यांना समजावुन घावे लागेल. अकारण सामाजिक असंतोष उत्त्पन्न करण्यापेक्षा त्यांनी त्यांना हवे तसे संग्रहालय उभारावे, त्यात वेदांची महत्ता गा वा अन्य कशाची, फक्त शिवाजी महाराजांना दैवी शक्तीचे प्रकटीकरण म्हणुन प्रोजेक्ट करण्याचे तात्काळ थांबवावे. महाराजांचा स्वतंत्र पुतळा उभारावा, न उभारला तरी काही एक फरक पडत नाही. पण भवानी भारती नामक अद्न्यात देवतेच्या हातुन महाराज तलवार स्वीकारत आहेत हे शिल्प/मुर्ती ही सर्वच शिवप्रेमींच्या ह्रुदयावरील घाव असेल हे क्रुपया समजावुन घ्यावे. शिवाजी महाराजांचे हे वैदिक अपहरण आता तरी थांबवावे.

-संजय सोनवणी

 
Design by Free WordPress Themes | Bloggerized by Lasantha - Premium Blogger Themes | JCPenney Coupons