Thursday, October 27, 2011

तुला व्हावेच लागेल ‘आंबेडकर’


 
मनू मानी ज्यांना महाअरी
तिथे तुझा जन्म झाला असेल तर
तुला व्हावेच लागेल आंबेडकर
युगांतरकारी आंबेडकर’!
क्रांतिकारी आंबेडकर’!
मनूचा मर्मांतक वैरी  आंबेडकर’!
 दुसरा पर्यायच नाही
 तुला व्हावेच लागेल आंबेडकर’!
 आंबेडकर  एवढा मोठा नाहीस झाला
 तरी लहानगा का होईना
 आंबेडकरच व्हावे लागेल तुला
 तुझ्या बापावरी मजूर नाही,
 वा मास्तरही नाही,
 कलेक्टरही नाही,
 फक्त आंबेडकर होणे आहे तुला
 म्हणजे सम्यक क्रांतीला
 देशात आणणे आहे तुला  !
 इथे या देशातील दुष्टांनी
 कधी देव होवून
 कधी देवावतार होवून
 कधी धर्म होवून
 फार छळले आहे देशवासीयांना  !
 स्त्री, शूद्र बहिष्कृतांना  !
 मूळ मालक असल्यामुळे
 एवढे पिडले की,
 तुझा संघर्षशील आंबेडकर होण्याविणा,
 संगरामागे संगर केल्याविणा
 गत्यंतर नाही तुला
 आंबेडकरांचे अनुकरण
 करणे जरूर आहे तुला
 अनेक युगांनंतर
 अनेक एकलव्य, शंभुकांनंतर
 एक आंबेडकर
 जगू शकले फक्त
 अन् तू त्यांच्यानंतर जगलेला!
 तुझ्या विकासाला कारण
 तू एकटा नाहीस,
 आणि नाही हिंदू धर्मपण
 तुझ्या विकासाला कारण
 आंबेडकर !
 हे ध्यानात धर
 त्यांचे अनुकरण कर
 अथवा दारूण देशभक्त
 क्रूर, कठोर क्रांती कर
 त्याविना हा भगवान बुद्धाचा
 सुफळ, सुंदर, समृद्ध देश
 ्रबुद्ध भारतोणार नाही
 राहील दंगलखोर कौरव पांडवांचा देश
 म्हणून मी म्हणतो
 तुला व्हावेच लागेल आंबेडकर
 करुणामय, क्रांतिकारक आंबेडकर’!
 भारत भाग्यविधाता  आंबेडकर’!
--- बाबूराव बागूल----

No comments:

 
Design by Free WordPress Themes | Bloggerized by Lasantha - Premium Blogger Themes | JCPenney Coupons