आजचा मान : - “राजमाता जिजाबाई” .... महाराष्ट्राची जिजाऊ यांचा
“राजमाता जिजाबाई (पोवाडा) - शाहीर पां.द.खाडिलकर “
सिंदखेडराजाला झाला जन्म जिजाई मातेचा ।
लखूजी जाधव पिता तियेचा सरदार निजामशाहीचा ॥
लखूजी जाधव-कन्या जिजाई मालोजींची ती सून ।
वीरपत्नीध शहाजी राजाची मोठी होती ती गुणवान ॥
जिजाबाई आमचं दैवत । मोठं जागृत ।
स्फूर्ति ती देत । आजही सार्यात महाराष्ट्रास ।
दुसरें दैवत नाहीं आम्हांस । तिच्या नांवाचा मोठा विश्वास ॥
गुलामगिरीची बेडी तोडून राज्य हिंदवी करण्याला ।
उत्सुक झाली होती जिजाई, ध्यास लागला जीवाला ॥
राजमाता जिजा महशूर । दिगंतावर ।
केला तिनं थोर । महाराष्ट्राचा राजा शिवराय ।
दुस्मान करी सदा हाय हाय । धन्य ती जिजा आपुली माय ॥
शिवनेरीला जन्म जाहला शिवाजीचा त्या वेळेला ।
महाप्रतापी बाळ जन्मला, आनंदाला भर आला ॥
जिजाबाई देई शिक्षण शिवाजी बाळाला ॥
रामायण महाभारत शिकवी ती त्याला ॥
दुष्टांचा नाश करण्याला । रामकृष्ण अवतार झाले शिकवलं त्याला ॥
लहानाचा मोठा बाळ झाला । अन्यायाची चीड ये त्याला ।
देवधर्म साधुसंताचा भक्त तो झाला ॥१॥
जिजाबाई आणि शिवराय गेले पुण्याला ॥
दादोजी कोंडदेव होते गुरुजी त्याला ॥
हिंदवी राज्य करण्याचा संकल्प केला ॥
तवां बोलला बाळ आईला । "आई आशीर्वाद दे मला ।"
रोहिडेश ठेवला साक्षीला । आणि हिंदवी राज्य करण्याच्या घेतलं शपथेला ॥
जिजाबाई बोलली त्याला । "बाळा ! आशीर्वाद हा तुला ।
जगदंबा तुझ्या पाठीला । भारी होशिल कळिकाळाला ।
शिवशंकर यश देणारा । धन्य धन्य माता ती धन्य बाळ तो झाला ॥२॥
शिवाजीचं मन तिनं भारलं थोर पराक्रम करण्याला ।
राजा शिवाजी तिनं घडविला, राज्य हिंदवी करण्याला ॥
संकटं आली मोठमोठालीं शिवरायावरती जेव्हां ।
’पुढेंच जा तूं, मागें सरुं नको’, माता बोलली हो तेव्हां ॥
"देवी भवानी प्रसन्न तुजला देईल यश तुज चौफेर ।
तूं सिंहाचा बच्चा, लांडगे कसे तुला रे धरणार" ॥
चालून आल अफझलखान । केली त्याचा दाणादाण ॥
चालून आला फाजलखान । निसटून गेला वीर महान ॥
चालून आला शास्ताखान । बोटं छाटून केला म्लान ॥
सिंह आग्र्याला सांपडला । तेथूनी पण सुटुनी आला ॥
कैक संकटें प्राणघातकी शिवबावरती जरि आली ।
तरी न माता डगमगली ॥३॥
धीर देत ती पुढे ली ।
शिवराज्याभिषेक सोहळा तिनं पाहिला ।
तृप्त झाला मातेचा डोळा ।
शहाजी राजे नव्हते परि ते सौख्य सोहळा बघण्याला ।
मनांत येऊन खिन्न जाहली वीरपत्नीा ती त्या वेळां ॥
पंधरा दिवस ही पुढें न जगली इहयात्रा ती संपविली ।
जगदंबेचे नांव घेऊनी परलोकीं निघुनी गेली ॥
पाचाड गांवी अंत तो झाला । रायगडाच्याच पायथ्याला ।
धन्य शहाजी धन्य जिजाई धन्य शिवाजी जगिं झाले ।
मायबाप ही धन्य पुत्र हा धन्य असे जगतीं झाले ॥
घरांघरांतून दर्शन होईल जिजामातेचें ते जेव्हां ।
भरभराट होईल देशाची निश्चित जन हो मग तेव्हां ॥
जिजाई व्हावें जगांत तुम्ही आयाबहिणींनो ही विनति ।
पांडुरंग शाहीर जाहला कीर्ति गावया सिद्धमति ॥४॥
विनंती :- लाइक करणे सोपे असते तेव्हा आपल्या प्रत्येक प्रतिक्रिये मधे जिजाऊ ना अभिवादन करा
3 comments:
Jai JIJAU!
dadoji konddev guru aslyacha chukicha ullekh hya powadyat aahe. krupaya bahujan vyaktine lihilela powada takawa.
bramhanane nahi.
राजमाता जिजाऊ यांस त्यांच्या जयंती निमित्त मानाचा मुजरा !!
हा दिवस महाराष्ट्रातील जनतेने मातृदिवस म्हणून साजरा केला पाहिजे.....
राजमाता जिजाऊ यांस त्यांच्या जयंती निमित्त मानाचा मुजरा !!
हा दिवस महाराष्ट्रातील जनतेने मातृदिवस म्हणून साजरा केला पाहिजे.....
Post a Comment