Friday, October 7, 2011

कार्ला लेण्यांवर एकवीरा देवीचे अतिक्रमण

http://mdramteke.blogspot.com/2011/10/blog-post_07.html

मधुकर रामटेके यांच्या ब्लॉगवरून साभार 




 
फोटो नं. १
   कार्ल्याच्या लेण्या जगप्रसिद्ध लेण्या आहेत. पण एकवीरा नावाच्या देवीने ईथे घूसखोरी केलेली आहे. आमच्या या बौद्ध लेण्यांच्या मुख्य़ द्वारातच एकवीरा देवीनी आपलं बस्तान बसवलं. कार्ल्याच्या लेण्यातील मुख्य बौद्ध स्तूपाच्या अगदी दारातच उजव्या कोप-यात एकवीरा देवीचं हे मंदीर म्हणजे बौद्ध धर्मीयांचा हिंदूनी केलेला जातीयवादी छळ होय. मंदिर बनवायचंच होतं तर संबंध डोंगर पडलं होतं. किंवा दुसरीकडेही मोकळी जागा होती. पण मंदिर उभं करण्या मागचा हेतू जातीयवादी असल्यामूळे बौद्ध स्तूपाच्या अगदी दारातच हे मंदीर उभं करण्यात आलं. या मंदिरामूळे आत जाण्याचा अर्धा मार्ग हिंदूनी गिळंकृत केला. आपल्याला आत जाण्यासाठी अर्धाच रस्ता सोडण्यात आला. 

  

 फोटो नं. २
   या फोटोत देवीचं मंदिर थोडसं दिसतं. त्या उजव्या कोप-तात निट बघा. अन तिकडे मागे जे दिसत आहे ते बौद्ध स्तूपाच्या मूख्य द्वाराचा भाग आहे. अगदी या मूख्य द्वारातच देवीला बसायची ईच्छा झाली. ती देवी आहे, कुठेही बसू शकते. 






फोटो नं. ३
  या फोटोत मधोमध जे  शेंदूरी रंगाचा मंदिर दिसतेय ते एकवीरा देवीचं मंदिर आहे. आत जाणा-या मूख्य वाटेतील हे मंदिर बौद्ध स्तूपावरील अतिक्रमण होय हे सांगण्याची गरज नाही ईतकी बोलकी परिस्थीत असुनही आम्हाला ब्र शब्द बोलण्याची परवानगी नाही.




फोटो नं. ४
       हा फोटो बघा. बौद्ध स्तूपात जाणारा हा एकमेव रस्ता. समोर दिसतय ते भव्य बौद्ध स्तूपाचं प्रवेश द्वार. डाव्या बाजूल दिसणारा भव्य स्तंभ हा अशोक स्तंभ होय. चउजव्या हाताला दिसणारा पसारा/बांधकाम हे एकवीरा देवीने स्तूपाच्या प्रवेशद्वारावर केलेलं अतिक्रमण होय. पायत चपला नघालता चालणारी जी लोकं दिसतायत ती सर्व देवभक्त होतं. अगदी प्रवेशद्वारावर होम-हवन घालण्यात आला आहे.  या होम-हवनामूळे बौद्ध बांधवाना स्तूपात जाण्यासाठीचा मार्ग बंद करण्यात आला. जो पर्यंत होम हवन चालू होतं तो पर्यंत बौद्ध स्तूपात जाण्यास बंधी घालण्यात आली. त्या नंतरही कित्येक तास लोकांनी होम हवनातील राख  पवित्र राख म्हणून उचलण्याचा कार्यक्रम चालविला.





फोटो नं. ५
     हा त्या प्रवेशद्वारातील डाव्या हातावरील भव्य अशोकस्तंभ होय. चार दिशांवर नजर ठेवणारे हे चार सिंह म्हणजे शत्रूच्या उरात धडकी बसविणारं प्रतीक. पण आज आमची अवस्था ईतकी बिकट व दुर्बल झाली की, सिंहांच्या पायथ्याशीच एकवीरेनी बस्तान मांडलं. वरुन स्तूपात जाण्याचा रस्ता अडविला.




फोटो नं. ६
    या फोटोत बघा, कसं स्तूपाचं मुख्य़ दरवाजा एकवीरेनी हडपलाय. मुख्य दाराला थेटून बांधलेलं हे एकवीरेचं मंदिर बौद्धाना अव्हान देणारं आहे. या मंदिरात दर्शन घेणारे भक्त नुसतं दर्शन घेत नाहीत. तर प्रचंड प्रमाणात आरडा ओरडा चालू असतो. आत स्तूपात शांत पणे स्तूप दर्शन घेणा-या लोकाना याचा प्रचंड त्रास होतो. एवढयावरच थांबले तर ते हिंदू कसले. मंदिरावर लावलेलं लाऊडस्पिकर बघा. या लाऊड स्पिकर जोर जोरात वाजवून, एकवेरेची गाणी लावून बौद्ध बांधवाना भंडावून सोडविण्याचं काम भक्तगण करत असतात.



  
फोटो नं. ७
         होम-हवन संपल्यावर सुद्धा स्तूपात जाणारी वाट मोकळी करण्यात आली नाही. उलट भक्तीभावाने होमचे दर्शन घेणारी लोकं अनवाणी पायानी कशी राख उचलण्यात मग्न झालित ते बघा. होम संपल्यावर सुद्धा आम्हाला प्रवेशा साठी आडकाठी आणणारी हि लोकं दांभिक नाहीत काय? तरी सुद्धा आम्ही शांत पणे प्रवेशासाठी संयमाचे धडे गिरवित होतो.





फोटो नं. ८
या फोटोत होम मधली राख उचलणारी बायी बघा. अन अगदी तीच्या मागे जे मंदिराचं दार आहे त्यातून भक्तांची उडालेली झुंबड बघा. बौद्ध स्तूपात जाण्यासाठी मार्ग कशा प्रकारे बंद करण्यात आला होता हे या फोटो अगदी स्पष्टपणे दिसत आहे.





फोटो नं. ९
स्तूपाचं मुख्य दार होम टाकून अडविल्यावर मनसोक्तपणे पूजा पाठ करणारे एकवीरा भक्त हे विसरलेत की आपण स्तूपाचं द्वार अडवून बसलो आहोत. याना स्तूपात जाणा-यांची गैरसोय होते यांशी काही देणे घेणे नाही.





फोटो नं. १०
    या फोटोतील लोकांच्या पायाकडे बघा. सर्व लोकं (एक सोडून) अनवानी पायानी होम दर्शनासाठी जमली आहेत. स्तूपात जाणारा रस्ता रोखून धरण्यात आला आहे. स्तूपात जाणा-याना दम भरण्याचं काम चालू होतं. उलट पक्षि होम जवळून चपला घालून चालू नका म्हणून आंगावर धावणारी लोकही होती. मूळात आमच्या रस्त्याव होम घातलाच कशाला असे विचारल्यावर उलटं आम्हालाच दम भरण्यात आला. 






फोटो नं. ११
हा बघा बौद्ध स्तूपाचा भव्य असा मुख्य प्रवेशद्वार. अन त्या प्रवेश द्वारावरील अतिक्रमणरुपी एकवीरा मंदिर.

  




फोटो नं. १२
स्तूपाच्या प्रवेश द्वारातीवरील होम, अन या होमचे दर्शन घेऊन मंदिराच्या आत डोकावणारी हि लोकं. खरंतर फोटोत दिसणारं बौद्ध स्तूपाच्या दिशेनी उघडणारं हे दार बंद होतं. तरी सुद्धा भक्तानी त्या दारात गर्दी केली व स्तूपाचा रस्ता रोखून धरला. स्तूपात जायला पुर्णपणे अडवणूक केली गेली होती.




फोटो नं. १३
हा बघा मंदिराचा तो दरवाजा जो बौद्ध स्तूपाकडे उघडतो. या दरवाजातून देवीचे दर्शन घेणा-यांची अधून मधून उडणारी झुंबड बौद्ध स्तूपाच्या वाटेत थेट अडथडा निर्माण तर करतेच पण वरुन त्या वाटेत घातलेल्या होम-हवनानी आज बौद्ध बांधवांची पार वाट लावली.



फोटो नं. १४  
लोकांनी स्तूपाच्या दिशेला उघडणा-या दारातून दर्शनासाठी कशी गर्दी केली ते बघा.



फोटो नं. १५
या फोटोत बघा. दोन माणसं होमातील राख उचल आहेत. त्याच बरोबर देवभक्त देवीच्या दारात उभं राहून दर्शन घेत आहेत. पाय-या व होम मधिल अंतर बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की कशा प्रकारे स्तूपाची वाट रोखण्यात आली होती. त्याच बरोबर वाटेत उभी माणसही बघा, ती सर्व देवीचे भक्त आहेत. एकाच्याही पायात चपला दिसत नाहीत.




फोटो नं. १६ 
पूजेचं ताट घेऊन थाटात मिरवणारे भक्तगण. पण या भक्ताना एवढं सुद्धा भान नाही की ते जिथे वावरत आहेत ती जागा बौद्धांची आहे. व मागे जे दिसत आहे ते पवित्र स्तूप आहे.


फोटो नं. १७ 
ईथेतर लिटरली होमच्या दर्शनासाठी लोकांची झूंबड उडाली. स्तूपाचा रस्ता पुर्णपणे रोखण्यात आला. याला काय म्हणावे तेच कळत नाही.  


फोटो नं. १८
होम-हवनाचं दर्शन घेणारे हे सर्व भाविक बौद्धांचे मारेकरी आहेत असे मी मानतो. बौद्धांच्या पवित्र स्तूपावरील आक्रमणाचा हा नजारा तळपायाची आग मस्तकात नेणारा आहे. मी स्वत: हे सर्व पाहताना अस्वस्थ होऊन गेलो.



फोटो नं. १९
होम संपल्यावर ही स्थीती आहे तेंव्हा होम चालू असताना काय तमाशा चलला असेल जरा विचार करा. हजारो लोकांच्या अलोट गर्दिने या ठिकाणी होम हवनाच्या निमित्ताने स्तूपात जाणारा मार्ग अडवून धरला. या होमला आमदार अनंत तेरे आले होते. त्या सर्वानी मिळून बौद्ध स्तूपाच्या मुख्य दरवाजात जातीयवादी कृत्य रचले. मी अनंत तेरे याना फोन लावून या बद्दल विचारना केली. ते म्हणाले तुम्हाला हवं ते करा आम्ही तिथेच होम लावणार. हवं तर तुम्ही बौद्ध स्तूपात येऊ नका. एवढी मूजोरी करणारे जातीयवादी लोकं बौद्धांच्या संस्कृतीला एक दिवस मिटवूनच दम घेणार. यांचा बंदोबस्त करणे अत्यावश्यक आहे.




फोटो नं. २०
पुजेचं ताट धरुन फिरणारा हा पांढ-या शर्टातील माणूस बघा. अन त्याच्या शेजार पाजारची सर्व माणसं देवीची भक्त आहेत. ते सर्व अनवानी पायानी होमचे दर्शन घेत आहेत. या सगळ्यानी स्तूपाची वाट कशी रोखून धरली ते बघा.





फोटो नं. २१
हा दूरुन घेतलेला फोटो बघा. यात तुम्हाला स्पष्टपणे दिसेल की कशा प्रकारे भव्य अशा बौद्ध स्तूपाच्या मुख्य दरवाज्यात देवीचं मंदिर बांधून बौद्धांच्या पवित्र स्थानांवर आक्रमण करण्यात आलं. डाव्या बाजूला दिसणारं बौद्ध स्तूपाचं भव्य प्रवेश द्वार बघा अन त्याच्या शेजारीचा जातीयवादी मंदिर बघा.  राम मंदिराचं निमित्य करुन मुस्लिमांवर अतिक्रमणाचा अरोप करणार हिंदू व त्याच्या मदतीला धावणारा मिडीया हे दोघं मिळून अयोध्या प्रकरणावरुन देश पेटवून देतात. पण याच्या अगदी उलट हिंदूनी  ईथे बौधांच्या स्तूपांवर केलेल्या अतिक्रमणा बद्दल मात्र हाच मिडीया मूग गिळून बसतो. किंबहून बौद्धाना दामदाटी करुन पिटाळून लावण्यात येते. काल अशोक विजयादशमीच्या शूभदिनी धम्मकच्रपर्वतनाच्या निमित्तानी मी सहकुटुंब या ठिकाणी गेलो. तेंव्हा हा प्रकार बघून थक्क झालो. मी विरोध केला, पण मला दम भरण्यात आलं. मी थेट आमदाराना फोन लावून विचारणा केल्यावर त्यानी सुध्दा मलाच दम भरला. उपस्थीत पोलिसांना भेटुन या बद्दल विचारल्यावर त्यानी हात झटकले. अशा वेळी आम्ही काय करावं? कुणाकडे जावं? मुस्लिमांच्या नावानी धर्मिक अतिक्रमणाचे खडे फोडनारे बौद्ध स्तूपावर अतिक्रमण करतात तेंव्हा कायदाही मदतीला येत नाही. आपण सर्वानी एकवटून या देवीला कार्ल्यातून पिटाळून लावता येईल का यावर विचार करु या. डॉ. परम आनंदनी ही मोहिम आधिच हाती घेतली आहे. आता गरज आहे ती आपण सर्वानी त्यांच्या या लेनी बचाव चळवळीला हातभार लावण्याची.

5 comments:

Dhiraj Kale said...

कारे रामातेकेंना तूच शिव्या घालतोस न ? स्वतःला मोठा सामाऊन त्यांच्यावर ब्राह्मणवादाचा आरोप करणारही तूच होतास, आता तुला रामेकेचे विचार आवडायला लागले का ?

Jignesh said...

What you said is extremely Right,but i think in this issue a way should be find out but in a cool way.nor Buddhism teaches to fight nor do Hinduism.
But a good Blog Appreciated

Unknown said...

@Dhiraj Kale ..
to whomsoever It may concern

भाई लय भारी जोक केलाय यार तू .. हाहाहाहाहाहा

shirish bhale said...

या लोकांना आता आपली जागा दाखवायची वेळ आलेली आहे. ज्रर बुध्द लेणींवर अतिक्रमण करत असतील तर आपण त्यांच्या मंदिरावर अतिक्रमण करुण तिथे बुध्द स्तुप बांधले पाहीजे... बस झाली यांचि दादागिरी ..आपण गप्प बसतो म्हणुन ते आपल्या धर्मावर उठले..उद्या आपल्या घरि मंदिर बांधायला मागेपुढे बघणार नाहीत...हिच जाग मिळाली का त्यांना मंदिर बांधायला...

shirish bhale said...

आचनक तेथे देवीचे मंइर आले कसे...का मुद्दाम बांधले ..तेही लेणीच्या प्रवेश द्वारा जवळ...हे नक्किच मुद्दाम केलेले कृत्य आहे...बालाजी सारख ..बालाजी हे एक बुध्द स्तुप आहे ..आणी त्याला विकृत करुण बालाजी तयार करण्यात आलेला आहे.

 
Design by Free WordPress Themes | Bloggerized by Lasantha - Premium Blogger Themes | JCPenney Coupons