Showing posts with label लोकशाहीर वामनदादा कर्डक. Show all posts
Showing posts with label लोकशाहीर वामनदादा कर्डक. Show all posts

Monday, October 24, 2011

महाकवी वामनदादा कर्डक यांचा संक्षिप्त जीवनपट



वामनदादा कर्डक 


जन्म         दि. १५ ऑगस्ट १९२२
जन्मस्थळ     देशवंडी, ता. सिन्नर, जि. नाशिक
आई          सईबाई कर्डक
वडील        तबाजी कर्डक
भावंड        सदाशीव (थोरला भाऊ) 
             सावित्राबाई (धाकटी बहीण)
पत्नी         शांताबाई कर्डक
मुलगी       मीरा (जगु शकली नाही)
दत्तक पुत्र     रविंद्र कर्डक


  1. घरची परिस्थिती आणि वडिलांचा व्यवसाय:  कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची. मोळया विकणे, टेंभुर्णिच्या पानाचे विडे करुन विकणे आणि हेडीचा व्यवसाय.
  2. दादांचे लहानपण : गुरं चारणे, जत्रेत कुस्त्या खेळणे, शिवडी येथे गिरणी कामगार, मातीकाम, सिमेंट कॉंक्रिटचे काम, चिक्की विकणे, आईसफ्रुट    विकणे,       खडी फोडणे, टाटा ऑईल मील मध्ये नोकरी, इत्यादी कामे करत लहानपण गेले.
  3. छंद :
    हिन्दी चित्रपट पाहणे, कथाकार, नट होण्याची अभिलाषा, वाचन, 'लल्लाट लेख' या नाटकात घुमा-याची भुमिका केली.
  4. लेखन :३ मे १९४३ रोजी पहिले विडंबन गीत लिहीले, तेव्हापासून २००४ पर्यंत गीत लेखन व गायनाचा अखंड प्रवास. प्रकाशित     आणि अप्रकाशित मिळून साधारणतः दहा हजाराच्या आसपास गीत रचना. उर्दुतील गजल, खमसा, नज्म हे प्रकार मराठीत  आणले.

  5. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भेट1940 साली नायगांव येथे बाबांचे प्रथम दर्शन, त्यानंतर चाळीसगांव, मनमाड, टिळकनगर येथे बाबासाहेबांच्या स्टेजवर      गायन.
पुरस्कार व सन्मान
  1. दिल्लीची डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशीप.
  2. राज्य शासनाचा दलीत मित्र पुरस्कार.
  3. महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी परिनिरीक्षण मंडळावर तीन वर्ष सदस्य.
  4. महाराष्ट्र शासनाच्या साहित्य आणि सांस्कृतिक मंडळावर सदस्य.
  5. औरंगाबाद येथे पहिला भव्य नागरी सत्कार (1987).
  6. प्रा. ऋषिकेश कांबळे संपादित पहिल्या लोकशाहीर वामन कर्डक गौरव अंकाचे प्रकाशन (1987)
  7. मधुकर भोळे संपादित वामन दादा कर्डक गौरव ग्रंथाचे प्रकाशन (2001)
  8. प्रा. डॉ. परशुराम गिमेकर संपादित वामनदादा कर्डक यांची गीत रचनालेख संग्रहाचे प्रकाशन.
  9. नाशिक, बुलढाणा येथे नाणेतुला, परभणी येथे प्रख्यात उर्दु शायर बशर नवाज यांचे सोबत वहीतुला, नंतर या वहयांचे गरीब मुलांना वाटप करण्यात आले.
  10. साहित्य, संस्कृती मंडळाची उत्कृष्ट कविरत्नही गौरववृत्ती.
  11. युगांतर प्रतिष्ठान तर्फे युगांतर पुरस्कार’ (1997)
  12. भाई फुटाणे प्रतिष्ठान, जामखेड चा संत नामदेव पुरस्कार
  13. बौद्ध कलावंत संगीत अकादमी मुंबईचा भीमस्मृती पुरस्कार
  14. भोपाळ येथे ताम्रपट प्रदान.
  15. भुसावळ येथे चांदीचे मानपत्र प्रदान.
  16. वसमतनगर जी. हिंगोली येथे स्वरार्हत संगीत संगीतीच्या वतीने नागरी सत्कार आणि गायन-संयोजक संजय मोहड.
  17. मराठवाडा अस्मितादर्श पुरस्कार
  18. वाटचाल’ (गीतसंग्रह) 1973
  19. मोहळ’ (गीतसंग्रह) 1976
  20. हे गीत वामनाचे’ (गीतसंग्रह) 1977
  21. माझ्या जीवनाचं गाणं’ (आत्मकथन) 1996
पुस्तके
ध्वनीफिती व चित्रपट गीते
  1. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भेट
  2. भीमज्योत
  3. जयभीम गीते
  4. सांगा या वेडीला माझ्या गुलछडिला (सांगते ऐका)
  5. चल गं हरणे तुरु तुरु (पंचारती)

Sunday, October 23, 2011

भीमा तुझ्या मताचे



भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते
तलवारीचे तयाचे न्यारेच टोक असते.

वाणीत भीम आहे, करणीत भीम असता
वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते.

गोळी खुशाल घाला फाशी खुशाल द्यारे
खोटे इथे खऱ्‍याचे दुसरेच टोक असते.

तत्वाची जाण असती, बिनडोक लोक नसते
सारे चलन तयांचे ते रोखठोक असते.

सदभाव एकतेचे जर अंतरात असते
चुकले कुणीही नसते सारेच एक असते.

वामन समान सारे स्वार्थाने अंध नसते
तुझ्या कृतिप्रमाणे सारेच नेक असते.

लोकशाहीर वामनदादा कर्डक.

Saturday, October 22, 2011

चांदण्याची छाया कापराची काया


चांदण्याची छाया कापराची काया
माऊलीची माया होता माझा भीमराया....

चोचीतला चारा देत होता सारा
आईचा उबारा देत होता सारा
भीमाईपरी चिल्यापिल्यावरी
पंख पांघराया होता माझा भीमराया....

बोलतात सारे विकासाची भाषा;
लोपली निराशा आता...लोपली निराशा ;
सात कोटीमधी विकासाच्या आधी
विकासाचा पाया होता माझा भीमराया....

झाले नवे नेते मलाईचे धनी ;
वामनाच्या मनी येती जुन्या आठवणी;
झुंज दिली खरी रामकुंडावरी;
दगडगोटे खाया होता माझा भीमराया.....

जरी संकटाची काळरात होती....



जरी संकटाची काळरात होती
तरी भीमराया तुझी साथ होती.
तुझी तेवण्याची सुरूवात होती,
प्रकाशात माझी पिढी न्हात होती.

पालवीत होते प्रकाशाचे गोळे,
चालवीत होते तुझे दोन डोळे,
प्रकाशाचे गाणे मनी गात होती....
अशी फौज माझी पुढे जात होती.

काळ्या काळजाची काळी काळदाती,
दात खात होती, पुढे येत होती,
तिचे काळे काळे, सुळे पाडण्याची
तुझी रग माझ्या मनगटात होती....

गणतीच माझी गुलामात होती
जिँदगीच माझी सलामात होती
तोडलीस माझी गुलामीची बेडी
अशी झुंजणारी तुझी जात होती.

मला दावलेली तुझी पायवाट
झाली अता ती विकासाची वाट
वदे आज "वामन" कालची तुझी ती
पेरणी उद्याच्या विकासात होती.

 
Design by Free WordPress Themes | Bloggerized by Lasantha - Premium Blogger Themes | JCPenney Coupons