Saturday, March 10, 2012

LOG - IN -भाग ३


मागील भागावरून पुढे 

आणि इंटरनेटने पहिला हरताळ पाळला ..
गेल्या भागात आपण इंटरनेटची जन्मकथा पाहीली. त्यानंतर आलेल्या एफ टी पी, टेलनेट सारख्या तांत्रिक शोधांमुळे संदेशवहनासाठी असलेल्या इंटरनेटचा वापर माहितीच्या मुक्त संचारासाठी होउ लागला. २००० सालापर्यंत पाश्चात्य राष्ट्रांनी संगणकयुगात दमदार पदार्पण केलेलं होतं. २००१ साली जिमी वेल्स आणि लॅरी सँजर यांनी आपल्या सहकार्यां सोबत इंटरनेटवरिल आणि जगातील सर्वात मोठा माहीतीकोश बनवण्याच्या उद्देशाने विकीपीडीयाची स्थापना केली. अल्पावधीतच या साईटने मोठी लोकप्रियता आणि अफाट वाचक, लेखकवर्ग देखील मिळविला. विकीपीडीयाच्या रुपाने खर्याह अर्थाने माहीतीचं मुक्त संचारण होउ लागलं.
गुगल, याहू, यु ट्यूब, फेसबुक हे युजर जनरेटेड कंटेट एका क्लिकसरशी सर्वांना उपलब्ध करून देतात. त्यांचा डेली ट्राफिक इतका मोठा आहे की, एकट्या गुगलला ९ लाख सर्वर सिस्टीम सुद्धा अपुरी पडत असल्याचे समोर आले आहे. ह्या साईट्सवर येणार्या  ट्राफिकएवढाच जाहीराती आणि त्यातून येणार्याय उत्पन्नाचा ओघ प्रचंड आहे. सॅटेलाईट मिडीयावरिल उत्पन्नाचा स्त्रोत असलेल्या जाहीराती ह्या इंटरनेट मिडीयमवर वेगाने वळल्या. नेमकं हेच अमेरिका आणि इतर देशातील मिडीया मुगल्सच्या डोळ्यात खुपायला लागले. आणि त्यातूनच जन्माला आली ती दोन बाळे सोपा आणि पीपा.
    
गेलं अख्खं वर्ष गाजलं ते जास्मीन रिव्होल्यूशन आणि भारतातील लोकपाल या कायद्याने. २०१२ ची सुरूवात देखील कायद्यांच्या गाजावाज्यानेच झाली ते म्हणजे सोपा आणि पीपा. अँटी पायरसी विरोधी कायदे असलेले SOPA स्टॉप ऑनलाईन पायरसी अॅक्ट आणि PIPA प्रोटेक्ट आयपी अॅक्ट हे अनुक्रमे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव आणि सिनेटचे प्रस्ताव आहेत. इंटरनेटवर अनिर्बंधपणे चालणार्याट पायरसीला आळा घालण्यासाठी हे कायदे उपयुक्त असल्याचं वक्तव्य हे मिडीया जायंट रुपर्ट मरडॉक यांनी केलं आहे. त्यासाठी त्यांनी अनेक कॅम्पेनही चालवली आहेत. 
केवळ डोनेशन वर चालणारं विकीपीडीया हे स्वतः कोणतीही जाहीरात स्विकारत नाही. माहीती आणि ज्ञानाचं मुक्त संचारण करणे, एका क्लिकवर हवी ती माहीती उपलब्ध करवून देणे, प्रत्येकाने आपआपल्या परिने योग्य, खरे संदर्भ देत नव्या माहीतीची, पेजेसची भर घालणे असा विकीपीडीयाचा सिंपल फंडा आहे. जिमी वेल्स ने  सोपा आणि पिपा ला विरोध करताना केलेल्या वक्तव्यात ऑनलाईन पायरसीला तीव्र विरोध असल्याचे देखील स्पष्ट केले आहे. पण सोपा आणि पीपा सारख्या कायद्यांमुळे व्यक्तिगत आणि अभिव्यक्ति स्वातंत्र्य धोक्यात येईल आणि कायदेशीर सेन्सॉरशिप बळावेल. मुक्त माहीतीच्या साधनांची गळचेपी आणि त्याचं मॅन्युफॅक्चरिंग कंसेट होण्याला हे कायदे जबाबदार ठरतील. पर्यायाने लाखो लोकांसाठी जॉब निर्माण करणार्याक इंटरनेट कंपन्यांना आपला व्यवसाय बंदच करावा लागेल.
बुधवार, १८ जानेवारी रोजी सकाळी ठिक दहा वाजता विकीपीडीयाने ब्लॅकआउट जाहीर केले. सलग २४ तास विकीपीडीया बंद राहण्याची ही पहीलीच वेळ. त्याचवेळी गुगलने देखील आपला लोगो काळ्या रंगाच्या पट्ट्याने झाकून टाकला. आणि भारतीय प्रमाणवेळेनुसार गुरूवार १९ जानेवारी, सकाळी १०.३० वाजता विकीपीडीया आणि गुगल पूर्ववत झाले. असा आगळावेगळा हरताळ किंवा संप नेटकर्यां नी पहिल्यांदाच अनुभवला. ह्यावेळी गुगल आणि विकीपीडीयासोबत अन्य संकेतस्थळांनी सुद्धा आपला निषेध नोंदवला होता.. ती पुढीलप्रमाणे.
1.             ProtestSOPA.org,  ह्या संकेतस्थळाने देखील आपला निषेध नोंदवला. SAVE THE INTERNET,  ACT NOW  ह्या स्लोगनसहीत ब्लॅकआउट केले. आपआपल्या सिनेटर्सना फोन करून पिपा आणि सोपा ला असलेला विरोध कळवण्यास देखील विनंती करण्यात आली होती.


2.             बोईंग बोईंग या सायंश फिक्शन मधील लोकप्रिय संकेतस्थळाने २४ तासांसाठी ब्लॅकआउटवर जाताना “Boing Boing could never co-exist with a SOPA world: असा संदेश मुखपृष्ठावर झळकवला होता.

3.             इम्गूर (Imgur) ह्या इमेज शेअरिंग साईटने “blacking out the Imgur gallery on January 18th from 8am-8pm EST चा संदेश झळकावत बंद पाळला होता.

4.             गुगल ने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले होते की, आम्ही आमचे चिन्ह हे काळ्या पट्ट्याने झाकणार असून संकेतस्थळ ब्लॅकआउट मध्ये जाणार नाही. परंतू गुगल च्या अमेरिकन होम पेज वर आम्ही हा विषय सातत्याने अग्रभागी ठेवू असे जाहीर केले होते.

5.             मुव्ह ऑन ह्या राजकीय विषयावरिल साईटने  ब्लॅकआउटवर जाताना अमेरिकन काँग्रेस इंटनेट सेंसॉरशिप च्या माध्यमातून भाषणस्वातंत्र्य, लिखाणस्वातंत्र्य आणि व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणू पाहत असल्याचे म्हटले होते.

6.             मोझिल्ला फायरफॉक्स ह्या लोकप्रिय वेब ब्राउझर ने आपला लोगो स्टॉप सेंसॉरशिप च्या बँड ने झाकला होता. त्यामुळे गुगल सारखी सर्च इंजिन्स चालू करताना फायरफॉक्स चे पेज चित्रात दाखवल्याप्रमाणे होते.

7.             Reddit पॉप्यूलर लिंक शेअरिंग आणि Tucows ह्या लिंक आणि फाईल्स शेअरिंग मधील लोकप्रिय साईट ने सोशल नेटवर्किंग साईटने सोपा आणि पिपाच्या दुष्परिणामांची माहीती देणारी पेजेस सोबत जानेवारी १८ रोजी सकाळी ८ ते रात्री ८ ह्या बारा तासांच्या कालावधीसाठी ब्लॅकआउटवर गेले होते. 
8.             WordPress.org ह्या प्रसिद्ध ब्लॉगिंग साईट्स ने सुद्धा ब्लॅकआउटवर जात आपला निषेध नोंदवला. 
इंटरनेटचा वाढता वापर, त्यातून निर्माण होणारा अवाढव्य नफा, मुक्त अभिव्यक्ती, मोफत माहीतीची उपलब्धता आणि अफाट लोकप्रियता मिळालेल्या सोशल नेटवर्किंग साईट्स नी सोपा आणि पीपाच्या विरोधात रणशिंग फुंकलयं. माहीतीचा मुक्त संचार रहावा आणि तो कोणत्याही पद्धतीने सेंसॉरशिपच्या विळख्यात अडकू नये एवढीच अपेक्षा असणार्‍या आमच्यासारख्या ई-युजर्सचा या सोपा आणि पीपा सारख्या कायद्यांना विरोध आणि या अभिनव हरताळवजा ब्लॅकआउटला पाठिंबा...

क्रमशः

(वरिल लेख हा साप्ताहिक कलमनामा मध्ये साईन इन ह्या सदरात प्रकाशित झालेला आहे . )  

 
Design by Free WordPress Themes | Bloggerized by Lasantha - Premium Blogger Themes | JCPenney Coupons