संपूर्ण दिवसभर अत्यंत जोशात चाललेल्या आंदोलनाला रात्री मात्र गालबोट लागले. सत्तेचे गुंगीने माजलेल्या काँग्रेसी भांडवलदारांनी दिल्ली पोलिसांना हाताशी धरून निर्दयीपणे लाठीमार करत आंदोलन अक्षरशः चिरडून काढले. त्याचा जाहीर धिक्कार असो. बाबा रामदेव यांच्या संवैधानिक अधिकारांवर गदा आणत जबरदस्तीने त्यांची रवानगी हरिद्वारला केली. सुरूवातीला नेमके का चाललंय याचा काहीच अंदाज लावता येत नव्हता. एक अंदाज तर ठरलेला होता, की येणार्या दिवसांत भारतीय राजकारणात मोठ्या उलथापालथी पहायला मिळणार... एकुणच अण्णांची उपोषण सेना आणि बाबा रामदेव यांची रामसेना ह्या सेल्फ मेड सिविल सोसायटीच्या दोन्ही गटांमागे शिजत असलेल्या राजकारणाचा हा मागोवा..
ज्येष्ठ काँग्रेसी दिगविजय सिंग, कपिल सिब्बल, प्रणब मुखर्जी सिविल सोसायटीने उभारलेल्या प्रत्येक आंदोलनाला काउंटर करण्यासाठी पुढे येतायेत, पण यांच्यापेक्षा मुरब्बी असलेला पी चिदंबरम नावाचा भांडवलवाद्यांचा दलाल नुकत्याच तीन राज्यांत पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांपासून एक साधी प्रेस काँन्फरंस घेत नाही याचे आश्चर्य वाटत होते. कारण ज्या पद्धतीने डिएमके ला बोलण्यात, प्रचाराच गुंगवून ठेवून, दुसर्या बाजूने सीबीआय चा फास आवळून करुणानिधींचा काटा काढण्याचा मास्टर प्लान तयार करणारा दुसरा तिसरा कोणी नाही तर आपले गृहमंत्रीच होय. एवढे सगळे सांगण्याचे कारण असे की, दिल्लीच्या रामलीला मैदानावर झालेल्या लाठीमारा कांडावर प्रतिक्रिया देण्यासाठी वास्तविक पाहता केंद्रीय गृहमंत्र्यांनी पुढे यायला हवे होते, पण त्यांच्याऐवजी कपिल सिब्बल पुढे आले. रामदेव बाबांचा हठयोग आणि अण्णांचे उपोषण हे एव्हाना राजकीय पाठिंब्यावर उभे पाहीलेले षडयंत्र आहे हे हळूहळू जगासमोर यायला लागले आहे. या एकुण प्रकारावर पत्रकार सुजय शास्त्री यांनी केलेली कमेंट बरेच ताही सांगून जाते. ती कमेंट मी येथे जशीच्या तशी देत आहे.
“बाबा रामदेव हे उत्तम उद्योजकही आहेत. त्यांच्या नावावर सुमारे २०० हून अधिक उद्योग असून त्यांच्या हरिद्वारमध्ये बेनामी अनेक प्रॉपर्टी आहेत. सरकारने मनात आणलं तर त्यांचा एका दिवसात सगळ्या बुरखा फाटू शकतो. बाबा रामदेवांनी मीडियामधून आपणं निष्कलंक असल्याची एक इमेज तयार केली आहे. या इमेजचा सरकारला सध्या त्रास होतोय. या बाबाच्या खुळचटपणामुळे भ्रष्टाचाराचा मूळ उद्देश मागेच राहिला आणि सरकार विरोधातलं नवं राजकारण सुरू झालयं. या रामदेवाला स्वतःचा राजकीय महत्त्व वाढवायचं आहे. या महत्त्वाला परिसस्पर्श करण्याची घाई भाजप, संघवाल्यांना झाली आहे. पण कालांतराने हे हिंदूत्व वादी पक्ष त्यांना गुंडाळणार हे सांगायला नको . हा सगळा संघाचा सुनियोजित डाव आहे. सरकारला भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून घेरायचं, आणि मध्यावधी निवडणुका घ्यायच्या असं सरळ राजकारण आहे. ”
वरिल कमेंट मधून एक गोष्ट लक्षात येण्याजोगी आहे ती म्हणजे या आंदोलनाआडून चालणारे राजकारण. त्या राजकारणाची शक्यता कदाचित पुढीलप्रमाणे असू शकतात..
1. काँग्रेस इतकी दुधखुळी नाही की केवळ सुडापोटी बाबा रामदेव यांच्या गर्दीवर बेछूट लाठीहल्ला करेल. हा लाठीहल्ला करण्यामागे अतिशय सुनियोजित डाव असल्याचे आत्ता दिसायला लागलेय.
2. बेछूट लाठीहल्ला झाल्यानंतर बाबा रामदेवांनी अतिशय चलाखीने भ्रष्टाचाराचा मुद्दा बाजूला सारत स्वतःची राजकीय पोळी भाजून घेणारे स्टेटमेंट सुरू केले. त्यातले पहिले स्टेटमेंट म्हणजे काँग्रेस माझे एन्काउंटर करणार आहे. आत्ता मी काँग्रेसचा विनाश केल्याशिवाय शांत बसणार नाही. भ्रष्टाचारावर बोलण्याऐवजी स्वतःच्या अस्मितेवर भाष्य करून ब्लॅकमेलिंग करण्याचा उद्योग सुरू केला आहे.
3. आजच म्हणजे ८ जून २०११ रोजी त्यांनी ११,००० तरूणांची शास्त्र आणि शस्त्र युक्त सेना उभारण्याची घोषणा केली. एक प्रकारे फॅसिस्ट विचारसरणीच्या आरएसएस ला पर्याय उभारून देण्याचीच भाषा केली गेली.
4. भाजप आणि संघाचा पाठींबा असलेला हा भ्रष्टाचार विरोधी लढा पूर्णपणे भाजपच्या पथ्यावर पडेल असे दिसत असताना अचानकपणे बाबा रामदेव यांनी निर्माण केलेल्या ट्विस्टमुळे त्यांच्या सर्व मनसुब्यांवर पाणी पसरताना दिसू लागलेय.
5. कालपरवा पर्यंत भ्रष्टाचारविरोधी हाच मुख्य गाभा असलेला लढा मिडीयाने RAMDEV v/s UPA असा प्रोजेक्ट करायला सुरूवात केली.
6. यात लक्षात येणारी महत्त्वाची दुसरी बाजू अशी की, रामदेव बाबानी या आधीच भारत स्वाभिमान संघटन नावाचा राजकीय पक्ष उघडून ठेवलाय. येनकेन प्रकारे आत्तापर्यंत योगागुरू असलेले रामदेव आत्ता हळूहळू संघीय विचारसरणीचे नेते बनू लागले आहेत. मिडीयाच्या साथीने येत्या आठवड्याभरात हिंदूत्ववादी नेत्यापर्यंतचा त्यांचा प्रवास देखील पूर्ण झालेला असेल.
7. एव्हाना पी चिदंबरम पण लुंगीला गाठ मारून मैदानात आलेत. बाबांच्या सेनेविरुद्ध कारवाई करण्याची घोषणा करून टाकली. मुळात पॉलिटिकल न्यूज मध्ये केवळ बाबाच लाईम लाईट मध्ये राहतील अशाच प्रकारची वक्तव्ये करण्याचा सपाटाच या काँग्रेसींनी लावलाय.
8. जर येणार्या निवडणुकांत बाबा रामदेव सर्व शक्तीनिसी मैदानात उतरले तर काँग्रसचेच भले होणार आहे. कारण स्वातंत्र्योत्तर काळापासून काँग्रेसचा ठराविक असा इमानदर मतदारवर्ग राहीलाय तो कधीच अन्य पर्याय स्विकारत नाही.
9. वरिल स्थिती पाहता, रामदेव बाबा जरी निवडणुका लढले तरी भाजपच्याच मतांची विभागणी होईल. अशा पक्क्या राजकारणाची खेळी आखुनच काँग्रेस मैदानात उतरल्याचे दिसतेय.
एकुणच काय ? यात सामान्य माणसाचे कुठेच भले होणार नाहीये. आधी भ्रष्टाचाराच्या ओझ्याखाली दबल होता, आत्ता या मुठभर सोवळ्यांच्या हुकूमाखाली दबतोय. लक्षात घ्या, येणार्या निवडणुकांत आपण मतपेटीतून भडवेगिरी करणार्या भ्रष्टाचार्यांना त्यांची लायकी दाखवू शकतो. पण सत्तेच्या उन्मादात जर उद्या ह्या सेल्फ मेड सिविल सोसायटीने हुकूमशाही आणली तर आपल्याकडे त्यांना हटवण्याचा कोणताही पर्याय शिल्लक नसणारेय. आपण आपल्या मताच्या ताकदीवर इंदिरा गांधीना देखील नाकारले, अटलबिहारी वाजपेयी सारख्या मुत्त्सद्दी माणसाला देखील नाकारण्याची हिम्मत दाखवू शकलो. पण भविष्यात या सिविल सोसायटीला आपण कोणत्याही पातळीवर नाकारू शकत नाही. तुमच्या मनातला राग दाबून ठेवा योग्य वेळी बाहेर पडण्यासाठी.
4 comments:
Dear Vaibhav,
You have been writing good articles. the points you have made on Ramdevbaba are also interesting. However, when you say that 'your generation' has seen many orators and communicators etc. I wonder which generation you belong to, and who are these great orators! Anyway, that is not the point. If you do get impressed by the gimmicks of Baba Ramdeo, it is mainly because you do not see the hollowness and the fraud that he is. Here when I say you it is not you per say, but any body. What he speaks is utter rubbish. But people think that any Baba or Gandhi like person speaks sense. That is unfortunate. The crushing of his so called agitation was invited by him. Democracy does not mean lawlessness and license. There could have been other ways of handling the Baba and his so called satyagraha(?). The very agenda of Black money is funny. From where does the Baba get the money he is lavishly spending on the agitations? are his donors all without black money? Why
not ask the question from where the black money gets generated? Are you people aware that whenever we buy anything and do not get receipt we help creating black money? Because that money then becomes unaccounted money. At many shops the shopkeeper tells you that if you do not insist on receipt the cost of the product will be less and people buy cheap creating black money. So much of black money is in circulation. Can such an issue be tackled by Ramdev baba like agitation? Govt has many lacunae regarding governance. However, if they do not keep law and order, that is the real failure of the government. It was so obvious that BJP and RSS were behind this whole tamasha. Had the government not acted in time, one was not sure what those people would have done. They do not bother about human life. They have proved it in the riots after Babri demolition. They are known to dishonor their own written words. In this case I go with Government. though I feel Police
brutality is unjustified in any circumstances.
With regards,
Aruna Pendse
Associate Professor, Department of Civics and Politics,
University of Mumbai, Pherozshah Mehta Bhavan, Kalina Campus,
Santacruz (East), Mumbai- 400098.
Mobile no. 9892197158
वैभव,
मित्रा एकदम जबरी लेख टाकलास.............. सडेतोड विश्लेषण केलसं मित्रा.
आता शांतपणे विचार करु दे.......
भ्रष्टाचार का मुद्दा तो एक बहाना ..
कही पे निगाहे और कही पे निशाना है ...
good one
Post a Comment